🔸अनेक रक्तदात्यांनी केले रक्तदान

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)

बुलडाणा(दि.4ऑक्टोबर):- प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ आणि सत्य पोलीस टाइम्स डिजिटल मीडिया न्युज चॅनलचे संयुक्त जिल्हा कार्यालय जळगांव जामोद येथे शानदारपणे मोठ्या थाटामाटात कोविडचे नियम पाळून उद्घाटन करण्यात आले. महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून रक्तदान शिबीर, नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता महात्मा गांधी, लाल बहादूर शास्त्री, डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले, राजश्री शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आली. याप्रसंगी देश सेवा करीत असताना जळगांव जामोद येथील भारतीय सेनेचे जवान मारोती किसन म्हस्के ज्यांची २००२ साली भारतीय सेनेसाठी निवड झाली व २०१९ साली लान्सनायक म्हणून रिटायरमेंट झाली. ज्यांनी आसाम, जम्मू काश्मिर, राजस्थान व भारतीय शांती सेनेच्या वतीने इस्राईल या ठिकाणी २००९ साली सेवा दिली. देश सेवा करीत असताना २०१८ मध्ये राजस्थान येथील जेसलमेर या ठिकाणी युद्ध अभ्यासा दरम्यान त्यांना कायमचे दोन्हीं पायांना अपंगत्व आले असे भारतीय सेना जवान मारुती किसन म्हस्के यांचे हस्ते प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ आणि सत्य पोलीस टाइम्सचे डिजिटल मीडिया न्युज चॅनलच्या बुलडाणा जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी रक्तदात्यांनी आपले मोलाचे योगदान देऊन ३९ बॉटल रक्त देऊन सहकार्य केले तसेच नेत्र तपासणीसाठी आलेले आलेले १९१ जेष्ठ नागरिक, महिला व पुरुषांनी आपला सहभाग नोदविला. त्यापैकी ७८ नागरिक हे मोतीबिंदूग्रस्त असून त्यांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ सत्य पोलीस टाइम्स डिजिटल मीडिया न्युज चॅनल हे त्यांना मार्गदर्शन करून ऑपरेशनची व्यवस्था करणार आहे. व इतर नागरिकांना तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्यानुसार औषधांचे वितरण करण्यात आले.

या समारंभासाठी प्रमुख अतिथी म्हणून डॉ संजय कुटे मा. आमदार जळगांव जामोद विधानसभा यांच्या पत्नी सौ अपर्णाताई कुटे, सौ सिमाताई डोबे (नगराध्यक्षा नगर परिषद जळगाव जामोद), सौ स्वातीताई वाकेकर (सचिव महाराष्ट्र काँग्रेस कमिटी), श्री प्रसेनजित पाटील (सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश रा. काँग्रेस कमिटी), श्री दत्ताभाऊ पाटील (शिवसेना सहसंपर्क प्रमुख), सौ लताताई तायडे (जिल्हा सरचिटणीस महिला आघाडी भाजपा), श्री डॉ संदीप वाकेकर (बालरोग चिकिस्तक स्पंदन हॉस्पिटल जळगाव जामोद), श्री तुकाराम काळपांडे (शिवसेना उपजिल्हा प्रमुख), श्री अभिमन्यु भगत (जेष्ठ पत्रकार दै दिव्य मराठी) श्री नामदेवराव उमाळे (जेष्ठ पत्रकार),श्री वीरसिंग राजपूत (मलकापूर आजतक चे संपादक तथा प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ बुलडाणा जिल्हा अध्यक्ष), श्री गजानन भाऊ ठोसर (मनसे जिल्हा अध्यक्ष तथा पत्रकार), श्री राजूभाऊ राऊत (मनसे तालुका अध्यक्ष), श्री आशिष सारसर (नगरसेवक न. प जळगाव जामोद), श्री नागेश भटकर (मनसे शहर अध्यक्ष) आकाश उमाळे पत्रकार, गौरव चोपडे पत्रकार, निकिता म्हसाल, वैष्णवी उमाळे, विठ्ठलभाऊ गावंडे पत्रकार, शहर प्रतिनीधी योगेश म्हसाळ आदी मान्यवर उपस्थित होते. प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष आणि सत्य पोलीस टाइम्सचे मुख्य संपादक डी. टी. आंबेगावे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी संचालन शुभम उमाळे, प्रास्ताविक रोहित चोपडे (कार्यकारी संपादक सत्य पोलीस टाइम्स तथा उपाध्यक्ष प्रेस् संपादक व पत्रकार सेवा संघ पुणे जिल्हा) व आभार प्रदर्शन राहुल ताठे (उपसंपादक सत्य पोलीस टाइम्स तथा कार्याध्यक्ष प्रेस् संपादक व पत्रकार सेवा संघ, बुलडाणा) यांनी केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ आणि सत्य पोलीस टाइम्स डिजिटल मीडिया न्युज चॅनलचे अभिनंदन करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच नेत्र तपासणी साठी लाभलेले जळगाव जामोद शहरातील सुप्रसिद्ध डॉ नंदकिशोर तायडे व रक्तदान शिबीरासाठी लाभलेले अकोला डायग्नोस्टिक सेंटर ब्लड सेंटर व कम्पोनेट युनिट यांनी विशेष सहकार्य केले.यावेळी ज्येष्ठ नागरिक, महिला व पुरुष, पत्रकार, समाजसेवक, डॉक्टर, युवक आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी अतुल दंडे (हिंदवी प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष) व त्यांच्या सहकारी मित्रांनी श्रमदान करून मोलाचे सहकार्य केले.या कार्यालयास प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे राज्य, विभागीय, जिल्हा व तालुका पदाधिकारी व पत्रकारांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

महाराष्ट्र, सामाजिक , स्वास्थ 
©️ALL RIGHT RESERVED