दापोरी येथे ‘शिक्षणोत्सवानिमित्त’ जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत !

22

🔸शाळा सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण !

✒️मोर्शी(पुरोगामी संदेश नेटवर्क)

मोर्शी(दि.4ऑक्टोबर):-कोरोनामुळे बंद असलेल्या राज्यातील शाळा तब्बल दीड वर्षांनंतर सुरु झाल्यामुळे शाळांची पहिली घंटा वाजली. ग्रामीण भागातील पाचवी ते बारावी आणि शहरी भागातील आठवी ते बारावीपर्यंतच्या वर्गांना सुरु करण्यास सरकारने परवानगी दिली आहे. त्यानुसार आजपासून या विद्यार्थ्यांचा शाळेच्या पहिल्या दिवसा निमित्ताने राज्य सरकारने परिपत्रक काढून शाळेच्या पहिल्या दिवशी शिक्षणोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर दापोरी येथील जिल्हा शाळेमध्ये शिक्षणोत्सव साजरा करण्यात आला.त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष तथा ग्राम पंचायत सदस्य रुपेश वाळके,केंद्र प्रमूख गजानन चौधरी यांनी जिल्हा परिषद शाळा दापोरी येथे विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व शिक्षणोत्सव पुढे अखंडित सुरू राहावा अशा शुभेच्छा दिल्या.

दापोरी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये विध्यार्थ्यांना औक्षण करून गुलाबपुष्प, चॉकलेट, मास्क देऊन विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. राज्य शासनाने केलेल्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करून विद्यार्थ्यांचे आरोग्य व सुरक्षितता यांना प्राधान्य देत आज शाळेची पहिली घंटा वाजली.
शाळेमध्ये विद्यार्थ्यांचा प्रवेश होताच त्यांचे तापमान व ऑक्सिजन तापसनी करण्यात आली. विध्यार्थ्यांना आवश्यक त्या सूचना देऊन विद्यार्थ्यांना पाठ्य पुस्तकांचे वितरण करण्यात आले यावेळी शाळेचा परिसर बहरल्याचे चित्र निर्माण झाले.

कोरोना प्रादुर्भाव आटोक्यात येत असल्यामुळे ग्रामीण भागातील शाळा सुरू करण्यात आल्यामुळे शाळेतील किलबिलाट आता पुन्हा सुरू झाला आहे त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र बघायला मिळाले.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वृषाली अढाऊ, प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके, केंद्रप्रमुख गजानन चैधारी, वैशाली घोरपडे,दिनेश श्रीराव, रवींद्र भुक्ते, माधुरी घोंगडे, सरिता पाचघरे, संध्या दरोकर, पुष्पा आगरकर, यांच्यासह ग्रा.प. सदस्य शिक्षक, शिक्षिका उपस्थित होते.