तलवाडा येथे शेतकरी आक्रोष परिषद, खा. राजु शेट्टी करणार मार्गदर्शन

27

✒️तलवाडा प्रतिनिधि (शेख आतिख)

तलवाडा(दि.4ऑक्टोबर):-राज्यभरात पावसाने हा हा कार माजवलेला आसल्याने बळीराजा राजाची येणारी दिवाळखोरीत साजरी होन्याचे सर्वकष चिन्ह दिसत आसतांना देखील सत्ताधारी मात्र स्वताहची दिवाळी दौ-याच्या निम्मीताने साजरी करत आसल्याचे जानवते. या आणुषंगाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने गेवराई तालुक्यातील तलवाडा येथे. कापुस,ऊस,सोयाबीन, मोसंबी पिकविमा ओलादुष्काळ शेतकरी आक्रोष परिषदचे आयोजन करण्यात आले असुन या शेतकरी आक्रोष परिषदेस शेतकरी संघटनेचे संस्थापक मा. खा. राजु शेट्टी साहेब मार्गदर्शन करणार आहेत. गेवराई तालुक्यातील तलवाडा येथे दिं.११/10/2021 रोजी सकाळी 10.30 वा. हनुमान मंदिर परिसर या ठिकाणी सर्व शेतकरी बांधवांनी उपस्थिति राहावे आसे आव्हाण शेतकरी संघटनेच्या युवती प्रदेशाध्यक्षा पुजाताई मोरे यांनी केले आहे.

गेवराई तालुक्यातील तलवाडा येथे होणा-या शेतकरी आक्रोष परिषदेतील प्रमुख मागण्या मराठवाड़यात तात्काळ ओलादुष्काळ जाहिर करा, नुकसान ग्रस्त शेतक-यांना सरसकट हेक्टरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई ध्या,
ऊसाच्या एफ. आर. पी 3 टुकडे न करता एकरकमी एफ. आर. पी द्या. पंचनाम्यामध्ये वेळ न घालता प्रधानमंत्री पिक योजना खरीप 2021 चा लाभ सर्व विमाधारक शेतक-यांना सरसकट सर्व पिकांना 100 टक्के लागू करावा. खरीप 2020 चा पिकविमा मंजूर होऊनही तो मिळालेला नाही तो तात्काळ देण्यात यावा. नुकसान होऊन देखील मागील दोन वर्षा पासुन मोसंबी उत्पादक शेतक-यांना रब्बी व खरीप फळबाग विमा भेटलेला नाही तो सरसकट 100 टक्के देण्यात यावा. सोयाबीनची विदेशात केलेली आयात थांबऊन 10,000 रुपये क्विंटल भाव देण्यात यावा. शेतात पाणी साचुन नुकसान झालेला ऊस कारखान्याने प्राधान्याने तोडुन न्यावा. पिककर्ज वाटपातील वशीलेबाजी थांबऊन प्राधान्यक्रमानेच पिक कर्ज वाटप करावा.

गावो गावी विज कनेक्शन तोडनी तात्काळ बंद करावी. घरांच्या पडझडी व मृत्युमुखी पडलेल्या जनावरांना 1 लाखांची मदत नुकसान भरपाई रुपी द्यावी. फुटलेले तलाव, वाहुन गेलेले रस्ते,पुल यांचे तात्काळ मजबूती करण करावे. गोदाकाठच्या प्रतेक गावाला धोबीघाट बांधावे. खरडून वाहुन गेलेल्या जमीन धारकांना हेक्‍टरी 2.5 लाख रुपये देन्यासह विविध मागण्या या आक्रोष परिषदेचा मुळ विषय राहणार असुन मा. खा. राजु शेट्टी शेट्टी सह मा. प्रा. डाॅ. प्रकाश पोपळे. मा. गजानन बंगाळे पाटील. मा. रमेश भोजकर. मा. प्रशांत डिक्कर. उपस्थित राहणार आसल्याचे शेतकरी संघटनेच्या युवती प्रदेशाध्यक्षा पुजाताई मोरे यांनी सांगीतले आहे.