शहरी भागाप्रमाणे खटावरांना आरोग्य सुविधा देऊ – उपमुख्यमंत्री अजित पवार

32

✒️प्रतिनिधी खटाव(नितीन राजे)

खटाव(दि.4ऑक्टोबर):-ग्रामीण भागातील जनतेला आरोग्य सुविधांसाठी शहराकडे धाव घ्यावी लागते.तो त्रास खटाव आणि आणि परिसरातील रुग्णांना होणार नाही यासाठी खटाव प्राथमिक आरोग्य केंद्रात अद्ययावत सुविधा व तज्ञ वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांची पूर्तता करण्यासाठी आम्ही तत्पर असल्याचे सांगितले.सातारा जिल्ह्यातील खटाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतीचा भूमिपूजन कार्यक्रम व भव्य कार्यकर्ता मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. अध्यक्षस्थानी राज्य विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर होते. पालकमंत्री बाळासाहेब पाटील खासदार श्रीनिवास पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आमदार दीपक चव्हाण, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष. सुनील माने, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले,प्रदीप विधाते आदी मान्यवर उपस्थित होते.

ग्रामीण भागातील जनतेला आजही वैद्यकीय उपचारांसाठी शहराकडे जावे लागते तो त्रास रुग्णांना होऊ नये यासाठी खटाव मध्ये अद्यावत आरोग्य केंद्र उभारत असून ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कोणतीही चिंता करू नये असे त्यांनी आवर्जून सांगितले साखर कारखाना चालवायची त्याच्यात धमक आहे त्यांनी खुशाल चालवावा. केळीची भीती आम्हाला नसून आम्ही कामच करतो त्यामुळे विरोधकांनी आता त्या भ्रमातून बाहेर येण्याचे ही यावेळी त्यांनी सांगितले . तसेच सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक ही जिल्ह्याचे अर्थवाहिनी असून ेऊ घातलेल्या निवडणुकीत नवीन चेहर्‍यांना संधी देऊ देणार असल्याचेही यावेळी त्यांनी आवर्जून सांगितले.

यावेळी बोलताना आमदार शशिकांत शिंदे म्हणाले कोरेगाव खटाव विधानसभा मतदारसंघातून माझा झालेला पराभवाने सर्वांनाच दुःख झाले आहे. त्याची तमा न बाळगता कार्यकर्त्याच्या पाठीशी भक्कम राहणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.पालकमंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले काळात प्राथमिक आरोग्य केंद्राने केलेली कार्य निश्चित कौतुकास्पद आहे. तरी देखील ग्रामीण भागातील आरोग्य सेवा या अध्यायात त्यासाठी प्रयत्न करू असेही यावेळी त्यांनी सांगितले यावेळी खासदार श्रीनिवास पाटील यांनी देखील मेळाव्यास मार्गदर्शन केले.