आदिवासी विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा छळ

27

🔸वसतिगृह सुरू करा आदिवासी विद्यार्थी संघाची मागणी..!

✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)

जिवती(दि.4ऑक्टोबर):-मागील दीड वर्षांपासून कोरोना महामारीलामुळे बंद असलेल्या शहर आणि तालुक्यातील जि.प. खाजगी शाळा, अनुदानित शाळा सोमवार पासून सुरू झाली आहेत.शाळेत पुन्हा विद्यार्थी किलबिलाट ऐकू येणार असल्याने उत्साह संचारला आहे.कोरोनाचा नियमांचे पालन शाळा सुरू करावयाच्या असल्याने त्यादृष्टीने शाळांनी व्यवस्था केली आहे. राज्यशासनाच्या निर्णयनुसार शहरी इयत्ता 8 वी ते बारावी तर ग्रामीण इयत्ता 5 वी ते बारावीपर्यंत शाळा आजपासून सुरू करण्यात आले.

जिल्ह्यातील वसतिगृह इयत्ता ११, १२ साठी चालू करण्यात यावी. तालुक्यातील ०८ ते १२ वी आणि आश्रम शाळेतील देखील वस्तीगृह चालू करण्यात यावी. आदिवासी विद्यार्थी संघ, चंद्रपूर यांची मागणी आश्रम शाळेत स्थानिक विद्यार्थी शाळेत जात आहेत पण काही ग्रामीण भागातील विद्यार्थी लांबवर असल्याने शाळेत येऊ शकत नाही. काही विद्यार्थी तालुक्यात ठिकाणी तर काही जिल्ह्याच्या ठिकाणी वसतिगृह राहून आपला शिक्षण पूर्ण करतो. शाळा सुरू पण राहण्याची व्यवस्था नसल्याने आदिवासी विद्यार्थी अजूनही घरीच सर्व स्तरावर शहरात व ग्रामीण भागातील शाळा सुरू झाली आहे.

पण अजुनपर्यंत आदिवासी वसतिगृह, आश्रम शाळातील वसतिगृह, तालुक्यातील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय चंद्रपूर, व प्रकल्प कार्यालयात चिमूर असे जिल्ह्यात दोन प्रकल्प कार्यलाय आहेत, या दोन प्रकल्प कार्यालयात अंतर्गत हजारो आदिवासी गोरगरीब विद्यार्थी आपला शिक्षण वसतिगृहात राहून पूर्ण करत होते.पण आदिवासी विकास विभाग या आदिवासी विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार का बर करत नाही.आदिवासी मुला-मुली शिक्षणाच्या प्रवाहात आलेली ही मुले मागील दीड वर्ष पासून ऑनलाईन,ऑफलाईन शिक्षण पासून सुद्धा वंचित आहेत. ही बाब जाणून आदिवासी विकास विभाग तत्काळ योग्य ते नियोजन लाऊन वसतिगृह व आश्रम शाळा चालू करावी.अन्यात रस्त्यावर उतरू आदिवासी विद्यार्थी संघ.चंद्रपूर जिल्ह्यातील वसतिगृह, आश्रमशाळेतील वसतिगृह बंद असल्याने हजारो विद्यार्थी शिक्षणाचे बळी ठरले आहेत.
आज खेड्यातील आदिवासी विद्यार्थी एक भविष्याचे स्वप्न रुजवून शिक्षण घ्यायला शहरातील वसतिगृहात प्रवेश घेतले.मग त्यांचा भविष्याचा विचार का बरं नाही कुणालाच.
आदिवासी विद्यार्थ्यांवर एवढा मोठा अन्याय का ? *कंटू कोटनाके जिल्हाध्यक्ष,आदिवासी विद्यार्थी संघ चंद्रपूर यांचा प्रश्न ?*

चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये शासकीय आश्रमशाळा आहेत. त्यामध्ये शासकीय आश्रम शाळेत प्राथमिक आश्रम शाळा, माध्यमिक आश्रम शाळा आठ तर उच्च माध्यमिक आश्रमशाळा एक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत असून, शासकीय व अनुदानित आश्रमशाळा हजार विद्यार्थी शिक्षणाचे धडे घेतात. मागील दीड वर्षां पासून या आश्रमशाळा बंद आहेत. आश्रमशाळा बंद झाल्यानंतर विद्यार्थी आपापल्या गावी गेले आहेत. गरीब परिस्थितीतील व आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकातील या विद्यार्थाकडे प्रशासनाने म्हणावे तसे लक्ष दिले नाही. घरी गेल्यानंतर या विद्यार्थ्यांनी शेतातील कामे, रोजंदारी, मजूर इत्यादी मार्ग वापरला आहे. शिक्षणाच्या प्रवाहात आलेली ही मुले गावाकडे गेल्यानंतर शिक्षणातील आद्याक्षरे विसरली आहेत. या मुलांना शाळेत भोजन मिळायचे ते देखील बंद झाले आहे. इतर शाळांमध्ये भोजनासाठी तांदूळ, डाळी व पौष्टिक अन्न मिळत होते, अशा पद्धतीच्या कोणत्याही सुविधा या विद्यार्थ्यांना नाहीत.

परिणामी पोटाची खळगी भरण्यासाठी हे विद्यार्थी गावाकडे गेल्यानंतर मजुरीच्या कामाकडे वळले. या वेळी कोणी ऊसतोडीला गेले तर कोणी मोलमजुरी करू लागले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे. एकीकडे शिक्षणाच्या प्रगतीकडे वाटचाल करीत असताना ऑनलाइन शिक्षण पद्धतीने शहरी भागांमध्ये विद्यार्थी इंटरनेटने जोडले. परंतु, ग्रामीण भागातील हे विद्यार्थी ज्यांनी आद्याक्षरे पुरेशी ओळखी नाही, त्यांना इंटरनेट काय असते, याबाबतची संकल्पना ही परिपूर्ण माहीत नाही. या विद्यार्थ्यांचे शिक्षणाचे वाटोळे झाले असल्याचे चित्र दिसून येत आहे. – कंटू कोटनाके जिल्हाध्यक्ष, आदिवासी विद्यार्थी संघ-चंद्रपूर

आदिवासी मुलांची वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी आहो. मी B.sc ची विद्यार्थीनि तर माझी लहान बहीण इयत्ता १२th सायन्स विद्यार्थ्यांनी आहे. शैक्षणिक नुकसान झाला आहे. माझ्यासारखे अनेक विद्यार्थ्यांनीची परिस्थिती गंभीर असल्यामुळे आम्ही कोणी किरायने रूम पण करून राहू शकत नाही.मग या वरून आता समोरच शैक्षणिक भविष्य किती अंधारात आहे हे चित्र स्पष्ट दिसून येतो. आदिवासी मुलांवर खूप मोठा शैक्षणिक फटका बसला आहे.
– अश्विनी कोरंगे (वसतिगृह विद्यार्थ्यांनी)

आज अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहेत. झालेली नुकसान तर भरपाई करून मिळणार नाही. पण आता तरी प्रकल्प अधिकारी यांनी आदिवासी विद्यार्थीचा परिस्थिती समजून इयत्ता ०८ ते १२ वी पर्यताचे वसतिगृह चालू करण्यात यावी.
– शुभम उईके (वसतिगृह, विद्यार्थी)

आमचे मुला शिक्षणापासून कोसो दूर गेल्याचे चित्र आमच्या डोळ्यासमोर दिसुन येत आहे. चांगल्या मोबाईल नाही, नेटवर्क नाही.यामुळे आँनलाईन शिक्षणच मिळाले नाही, त्यामुळे आता तरी लवकरात लवकर वस्तीगृह चालू करा.वस्तीगृहात सुरु झाल्यावर आमचे आदिवासी विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात येतील.आज परिस्थिती महामारीलामुळे बिकट दिवसा पाहयाल मिळत आहे. या परिस्थितीत आम्ही आमचे मुलांना रूम भाड्याने करून देऊ शकत नाही.आज ग्रामीण भागात आदिवासी विकास विभागाकडे समाजचे असंतोष निर्माण झाली आहे. ही असंतोष दूर करावी अशी अपेक्षा पालकांकडुन व्यक्त केली जात आहे, सिताराम मडावी पालक पाटण ता.जिवती