ग्रामसेवक युनियनचे चिमूर तालुकाध्यक्ष पदावर मोतीराम मडावी तर सचिव म्हणून दादाराव बांगडे यांची निवड

36

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमुर(दि.5ऑक्टोबर):-ग्रामसेवक युनियनचे चिमूर तालुकाध्यक्ष पदावर मोतीराम मडावी तर सचिव म्हणून दादाराव बांगडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन डी एन ई 136 तालुका शाखा चिमुरची प्रकाश खरवडे (जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन) यांचे अध्यक्षतेखाली तसेच विठ्ठल नखाते (सहसरचिटणीस जिल्हा शाखा), राकेश साव (राज्य समन्वय जिल्हा शाखा चंद्रपूर), केशव गजभे (प्रचार प्रसिद्धी प्रमुख जिल्हा शाखा चंद्रपूर) तसेच माजी जिल्हा सरचिटणीस संजीव ठाकरे, माजी जिल्हा उपाध्यक्ष श्री.मोतीराम मडावी, सचिन घारगे, कु.मंजुषा ढोरे, रमाकांत गुरनुले (तालुका सरचिटणीस) यांचे उपस्थितीत सभा पार पडली.

प्रकाश खरवडे जिल्हाध्यक्ष तसेच सहकारी यांची जिल्हा शाखेवर निवड झाल्यानंतर प्रथम आगमन झाल्यामुळे तालुका कार्यकारणीने शाल व पुस्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले.या सभेत ग्रामसेवक संवर्गाच्या असणाऱ्या समस्यावर चर्चा करून चिमुर तालुक्यातून बरेच ग्रामसेवक बंधू बदलून गेल्याने नव्यानं तालुका कार्यकारणी चे गठन करण्यात आले.

या मध्ये तालुकाध्यक्ष म्हणून मोतीराम मडावी तर सचिव म्हणून दादाराव बांगडे यांची निवड सर्वानुमते करण्यात आली तसेच कार्यकरणीतसंजय ठाकरे (कोषाध्यक्ष), समर्थ उराडे (उपाध्यक्ष), कु.वैशाली गेडाम (महिला उपाध्यक्ष), महेंद्र मस्के (सहसचिव), नरेश धवणे (सल्लागार), लोकचंद भसारकर (प्रसिद्धी प्रमुख), सदस्य चेनिसराम मेश्राम, राजेश कांबळे,चंद्रशेखर पाटील, गोधनकर यांचा कार्यकारणीत समावेश आहे.

नव्याने निवड झालेल्या तालुका कार्यकारणीची मा. जिल्हाध्यक्ष प्रकाश खरवडे यांनी अभिनंदन केले. सभेचे संचालन समर्थ उराडे यांनी केले तर प्रास्ताविक विठ्ठल नखाते यांनी केले. मान्यवरांचे मनोगत झाल्यानंतर जिल्हाध्यक्ष यांनी आपले विचार मांडले. आभार प्रदर्शन श्री. संजय ठाकरे यांनी केले.