राष्ट्रवादी काँग्रेस कामगार सेलची आढावा बैठक संपन्न

27

✒️पिंपरी(पुरोगामी संदेश नेटवर्क)

पिंपरी(दि.ऑक्टोबर):- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पिंपरी येथील कार्यालयात नुकतेच कामगार सेलची आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.शहर अध्यक्ष श्री संजोगभाऊ वाघेरे पाटील यांच्या नेतृत्वाखालील ही बैठक घेण्यात आली. यावेळी कामगार सेलचे मुख्य सल्लागार व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक व राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी चिंचवडचे संघटक श्री अरुण बोराडे उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस कामगार सेलचे अध्यक्ष श्री किरण चंद्रकांत देशमुख यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

“सध्याच्या परिस्थितीत केंद्र सरकारने जे कामगार कायदे कामगारांच्या हिताचे न बनवता कामगारांच्या विरोधी आहेत त्यामुळे कामगारांचे इथून पुढचे भविष्य खूप अवघड असुन कामगार वर्ग धोक्यात आहे पुढचा काळ कामगारांसाठी कठीण आहे. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी कामगारांनी एकजूट राहावे संघटीत व्हावे तरच कामगार हीत हे साध्य होईल”. असे मत अरूण बोराडे यांनी व्यक्त केले ते पुढे म्हणाले “हा कायदा सुधारण्यासाठी आपण आग्रही असुन कामगारांवर होणाऱ्या अन्याय विरोधात लढा द्यायच्या सूचना त्यांनी दिल्या आणि आपल्या कामगार सेल तर्फे महाराष्ट्र राज्य शासनाला ह्या कायद्यांची महाराष्ट्रात अंमलबजावणी करू नये या बाबतीत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन देण्यात यावी अशाही सूचना करण्यात आली.

चिंचवड एमआयडीसीतील लुमॅक्स इंडस्ट्रीज कंपनीतील निलंबित कंत्राटी कामगारांच्या न्यायालयीन लढ्याबाबत चर्चा करण्यात आली तसेच चाकण येथील फिरोशिया कंपनीतील कायमस्वरुपी असणाऱ्या कामगारांना अन्यायकारक निलंबित केल्याप्रकरणी राष्ट्रवादी कामगार सेल ची भूमिका काय असावी व पुढची दिशा ठरवली तसेच यावेळी कामगार सेल पिंपरी चिंचवड तर्फे नवीन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र व ओळखपत्राचे वाटप करण्यात आले तसेच कामगार सेल पिंपरी चिंचवड तर्फे सर्व पदाधिकाऱ्यांना परीक्षा प्रशिक्षण सत्र आयोजित करणेबाबत ठराव मंजूर करण्यात आला.

या वेळी दिपक गायकवाड, संदीप शिंदे, राकेश चौधरी, संतोष शिंदे, प्रफुल शिंदे, आकाश पालकर, शिवाजी वालवणकर, लक्ष्मण राठोड, सुरेश झावरे, दिपक मोंडोकार, मयुर देशमुख आदी पदाधिकारी उपस्थित होते.