✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

आष्टी(दि.5आँक्टोबर):- २०२१ रोजी बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी जिल्हा परिषद अंतर्गत विभाग प्रमुखासमवेत शासनमान्य दिव्यांग कर्मचारी संघटनेच्या बैठकीचे आयोजन केले होती.आयोजीत बैठकीत दिव्यांग व्यक्ती/ दिव्यांग कर्मचारी यांना मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले.

सदर बैठकीत दिव्यांग पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते अण्णासाहेब साबळे यांचा सन्मानपत्र देवून सन्मान करण्यात आला.त्यांचा सन्मान केल्याबद्दल राजाभाऊ देशमुख,भाऊसाहेब शिरोळे,बद्रीनाथ भोसले,गोरख फुंदे,नागनाथ गर्जे आदींनी अभिनंदन करुन भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED