✒️विशेष प्रतिनिधी(समाधान गायकवाड)

अंबाजोगाई(दि.५ ऑक्टोबर):-परळी विधानसभा मतदारसंघातील पट्टीवडगाव ता. अंबाजोगाई जि. बीड येथील मागासवर्गीय कुटुंबातील सुजत सत्यपाल वाघमारे या विद्यार्थ्याने जवाहर नवोदय विद्यालय मध्ये शिक्षण घेऊन इयत्ता दहावी मध्ये ९१ टक्के गुण प्राप्त केले. त्या विद्यार्थ्यास ११वी सायन्स ला प्रवेश घेऊन डॉक्टर होण्याचे स्वप्न आहे. परंतु त्यांची घरची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट असल्यामुळे व अकरावी- बारावी सायन्स फॅकल्टी साठी महाविद्यालयामध्ये प्रवेश घेऊन डॉक्टर होण्यासाठी आवश्यक असणारे कोचिंग क्लासेस लावण्यासाठी आर्थिक मदतीची गरज असल्याचे त्याचे वडील सत्यपाल वाघमारे यांनी ॲड. माधव जाधव यांना सांगितले.

लागलीच ॲड. माधव जाधव यांनी त्याची सत्यता पडताळणी करून सुजत वाघमारे हा विद्यार्थी अतिशय गरीब कुटुंबातील असून तो हुशार व होतकरू असल्याची खात्री झाल्याने पट्टीवडगाव गावचे युवा नेते व माजी सरपंच गोविंदराव तारसे , पंचायत समितीचे माजी सभापती व सेवा सहकारी सोसायटीचे व्हाईस चेअरमन माधवराव लव्हारे , अशोक भय्या वाकडे व गणेश भैय्या जाधव व संदीप भैय्या जाधव, सय्यद काबू , इंद्रजीत तारसे यांचे सोबत ॲड. माधव जाधव यांनी पट्टीवडगाव येथे जाऊन सुजत सत्यपाल वाघमारे या विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्याची आजी व चुलते यांचे समक्ष सुजत सत्यपाल वाघमारे या विद्यार्थ्यास १००००/- रू.( दहा हजार रुपये) चा धनादेश देऊन आर्थिक हातभार दिला व सुजत वाघमारे यास ” डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण कर त्यासाठी आवश्यक असणारी सर्व ती मदत करण्याचे आश्वासन” किसान काँग्रेसचे मराठवाडा अध्यक्ष तथा काँग्रेस पार्लमेंटरी बोर्ड सदस्य ॲड. माधव जाधव यांनी दिले.

एका गरीब कुटुंबातील व विशेषतः मागासवर्गीय कुटुंबातील असलेल्या सुजत सत्यपाल वाघमारे या विद्यार्थ्यास ॲड माधव जाधव यांनी शिक्षणासाठी मदत करून त्या विद्यार्थ्यांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यास अतिशय मोलाचा आधार दिलेला आहे.विशेष म्हणजे तीन दिवसांपूर्वीच ॲड. माधव जाधव यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान ग्रस्त झालेल्या शेतकरी बांधवांना त्यांचे फेसबुक पेज वरून विनंती केली होती की, झालेल्या नुकसानीमुळे घाबरून न जाता जर कोणाला शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी काही मदतीची गरज असेल तर ॲड.
माधव जाधव यांनी संपर्क करण्याचे आवाहन केले होते व फेसबुक वरील ती पोस्ट पाहून सुजत वाघमारे चे वडील सत्यपाल वाघमारे यांनी ॲड माधव जाधव यांना संपर्क केला व लागलीच ॲड माधव जाधव यांनी त्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदत केली.

महाराष्ट्र
©️ALL RIGHT RESERVED