सिन्नर येथे आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन उत्साहात संपन्न

27

✒️सिन्नर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

सिन्नर(दि.5ऑक्टोबर):-महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय सिन्नर येथे आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.प्रारंभी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. लोंढे सर यांच्या हस्ते दत्ताजी वायचळे यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. माजी नायब तहसीलदार दत्ताजी वायचळे साहेब यांनी आपल्या मनोगतातून विद्यालयाच्या प्राचार्यांचे आभार व्यक्त केले. त्यांनी आपल्या भाषणातून 365 दिवसांपैकी 300 दिवस दिन विशेष साजरे केले जातात. त्यापैकी 5 सप्टेंबर, 5 ऑक्टोबर, 28 नोव्हेंबर हे साधारणतः शिक्षक दिन म्हणून भारतभर साजरे केले जातात. त्यापैकी 28 नोव्हेंबर महात्मा ज्योतिबा फुले स्मृतिदिन बरेच ठिकाणी शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.

याबाबत समाधान व्यक्त केले. तसेच एखाद्या शिक्षकाचा राष्ट्रपती होऊन सन्मान होणे यापेक्षा एखाद्या राष्ट्रपतीने शिक्षकाचे काम केले तर तो अधिक अभिमानास्पद ठरेल असे डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचे बाबत गौरवोद्गार काढले. महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई यांनी केलेले शैक्षणिक कार्य हे उल्लेखनीय व गौरवास्पद आहे. शिक्षण घेण्यास प्रतिकूल परिस्थिती असताना देखील त्यांनी केलेले कार्य हे अभिमानास्पद असून आपल्या संस्थेचे पूर्वजांनी जी संस्था उभारणीचे कार्य केलं हे तर अगदीच उल्लेखनीय असल्याचे देखील त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले. तसेच शिक्षकांचे सक्षमीकरण करण्यासाठी 1994 पासून युनेस्कोने ठराव करून हा आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन साजरा करण्यात येत आहे. शिक्षकांचा सन्मान केला जातो. 3 जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती व 12 जानेवारी जिजाऊ माता यांची जयंती या दिवशी ‘सावित्री ची गाथा’ या ग्रंथाचे पारायण केले जाते.

बचत गटांच्या माध्यमातून महिला हे पारायण करतात. हे कार्य कोणतेही मानधन न घेता विनामूल्य केले जाते.याबाबत देखील त्यांनी विशेष प्रशंसा केली. हे पारायण सर्वच ठिकाणी करण्यात यावे असं आवाहनही यावेळी त्यांनी केलं. त्याच बरोबर माझ्या घरासमोर एक छोटेसे ग्रंथालय मी कार्यरत केले असून येणाऱ्या काळामध्ये राज्य सेवा व लोकसेवा या परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक अभ्यासिका सुरू करण्याचा मानस त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला.

यावेळी सर्व उपस्थित शिक्षक व शिक्षकेतर यांचा सत्कार व आभार व्यक्त करून त्यांनी आपले मनोगत संपवले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक श्री. आर.एच. मीठे सर यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री.आर.आर. महात्मे सर यांनी केले. यावेळी मंचावर विद्यालयाचे मुख्याध्यापक लोंढे सर,पर्यवेक्षक श्री.बलक सर, उपमुख्याध्यापक श्री.आर.आर.महात्मे सर तसेच विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षिका एच.व्ही. बलक मॅडम व सर्व शिक्षक व विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षिका यांच्या उपस्थितीत कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.