“बौद्ध जीवन संस्कार पाठ” या पुस्तकाच्या छपाईसाठी यवतमाळ जिल्ह्याचे पहिल्या क्रमांकाचे योगदान

29

🔸भिमराव आंबेडकर यांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.6ऑक्टोबर):-दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा या संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय भिमराव यशवंतराव आंबेडकर यांनी बौद्ध जिवन संस्कार पाठ या पुस्तकाच्या छपाईसाठी केलेल्या आवाहनानुसार यवतमाळ जिल्हा (पश्चिम) तर्फे रविजी भगत जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वात “बौध्द जीवन संस्कार पाठ’ या पुस्तकाच्या छपाई करीता यवतमाळ जिल्ह्यातील तमाम दानदात्यांनी भरभरून दान दिले आणि पाहाता पाहाता एक लाख दोन हजार रूपयांची देणगी केंद्रिय कार्यकारिणी कडे जमा करण्यात आली.

या भरीव कामगिरीमुळे महाराष्ट्र राज्यातून यवतमाळ जिल्हा शाखेचा प्रथम क्रमांक आला. याची दखल घेऊन दि.३/१०/२०२१ रोजी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर भवन मुंबई येथे संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आद.भिमराव आंबेडकर तसेच केंद्रीय पदाधिकारी यांच्या हस्ते शाल,सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन यवतमाळ जिल्ह्याशाखेचा गौरव करण्यात आला.

यावेळी यवतमाळ जिल्हा शाखेचे रविजी भगत जिल्हाध्यक्ष व केशव भागवत तसेच बापुराव मुजमुले केंद्रीय शिक्षक मुंबई यांनी हा पुरस्कार स्विकारला आहे.यवतमाळ जिल्ह्यतील आश्रयदाते,दानदाते , हितचिंतक हे संस्थेच्या धम्मकार्यासाठी लागणा-या मदतीसाठी नेहमीच पुढाकार घेतात. आपल्या कडून मिळालेल्या सहकार्यामुळे हे शक्य झाले आहे.यासाठी महाराष्ट्र राज्यातून तमाम धम्मबांधवानी जिल्हा शाखेचे अध्यक्ष रवि भगत व त्यांना मदत करणारे दानदाते धम्मबांधव यांचे कौतुक केले आहे.तसेच अभिनंदनासह स्वागत ही केले आहे.