राजनगट्टा यथे वन्यजीव सप्ताह साजरा

29

✒️भास्कर फरकडे(विशेष प्रतिनिधी)

चामोर्शी(दि.6ऑक्टोबर):- – वनपरिक्षेत्र चामोर्शी व छत्रपती शिवाजी युवा मंडळ राजनगट्टा च्या वतीने मिळून राजनगट्टा येथील जंगल परिसरात साफसफाई करून वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात आला. यावेळी वन्यजीवाचे मानवी आयुष्यातील महत्व सोबतच वन्यजीवांकडून होत असलेले मानावावरील आक्रमक व मानवाकडून वन्यजीव यांची शिकार रोखण्या करिता विविध उपाय योजना यासंदर्भात भाडबीडी चे क्षेत्र सहाय्य नरुले यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.

कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून वनहक्कसमिती राजनगट्टा चे अध्यक्ष वसंत कोहळे, आमगाव(म.) चे वनरक्षक लांजेवार, करकापल्ली चे वनरक्षक राऊत, सामजिक कार्यकर्ते प्रकाश चीचघरे, छत्रपती शिवाजी युवा मंडळ राजनगट्टा चे सचिव अनुप कोहळे, मंडळातील इतर सदस्य सोबतच राजनगट्टा, करकापल्ली, वालसरा येथील युवक मोठया संख्येने उपस्थित होते.