मोहाडी गावचा आदर्श द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी घ्यावा – मुंडावरे

30

✒️नाशिक,जिल्हा प्रतिनिधी(शांताराम दुनबळे)

नाशिक(दि.6ऑक्टोबर):-जगभरातील द्राक्ष पिकांचा अभ्यास करून आधुनिक तंत्रज्ञाना द्वारे द्राक्ष उत्पादनांत उज्ज्वल यश संपादन करणारे मोहाडीच्या सह्याद्री फार्मचे संचालक विलास शिंदे, सुरेश कळमकर, विलास पाटील बाळासाहेब गडाख यांचा आदर्श द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांनी घ्यावा असे आवाहन नाशिकचे उप जिल्हाधिकारी नितीन मुंडावरे यांनी केले. मुंडावरे हे कर्मयोगी ई. एन निकम यांच्या स्मृतिदिनानिमित्त सुहिरा पेट्रोल पंप व राष्ट्रीय विश्‍वगामी पत्रकार संघ आयोजित नवनियुक्त राज्य द्राक्ष बागायतदार संघ संचालकांच्या सत्कार समारंभात बोलत होते.

अध्यक्षस्थानी कादवा साखर कारखान्याचे संचालक शहाजी सोमवंशी हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना माजी गटनेते प्रवीण जाधव, शिवसेना तालुकाप्रमुख पांडुरंग गणोरे ओझर कॅनल बागायतदार संघाचे व्हाईस चेअरमन सुदामराव पाटील वसंत देशमुख माणिकराव देशमुख, राष्ट्रीय विश्‍वगामी महिला संघाच्या प्रदेश उपाध्यक्ष मीरा गोसावी उपसचिव वैशाली बनसोडे प्रांजल मैद, वर्षा डिंगोरे, उपसचिव सोमनाथ मानकर, आंतराष्ट्रीय उद्योजक हेमंत निकम,माणिकराव निकम विनायक निकम , राष्ट्रीय विश्‍वगामी पत्रकार संघ अध्यक्ष संतोष निकम, अनिल निकम, सुनील निकम, हे उपस्थित होते सह्याद्रि फार्मचे व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे व सुरेश कळमकर यांची महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघ पुणे संघाच्या संचालक पदी व बाळासाहेब गडाख यांची संघाच्या नासिक विभाग मानद सचिव पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

निवड झाल्याबद्दल तीनही सत्कार मूर्तींना शुभेच्छा देवुन संघाच्या माध्यमातुन आपण शेतक-यांच्या अडचणी सोडवाव्या असे आवाहन सुहिरा पेट्रोल पंपाचे संचालक सचिन निकम यांनी केले. सत्कारार्थी सुरेश कळमकर, बाळासाहेब गडाख यांनी केलेल्या सत्कारा बद्दल आभार मानले व द्राक्ष बागाईतदार संघात चांगले काम करण्याचे आश्वासन दिले.सह्याद्रि फार्म चे व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे यांनी सांगितले की आज द्राक्ष शेतकरी अतिशय वाईट परिस्थितीतून जात आहे द्राक्ष बागाईतदार संघाच्या माध्यमातुन द्राक्ष शेतीच्या अडचणी सोडवण्याचे काम केले जाईल असे आश्वासन सत्कार मूर्तीनी दिले.कार्यक्रमाचे अध्यक्ष कादवाचे संचालक शहाजी सोमवंशी यांनी ही संघाच्या माध्यमातुन द्राक्ष शेतीमध्ये आधुनिकीकरण करा व शेतक-यांना बाजार भावाची हमी मिळवुन देण्यासाठी प्रयत्न करा असे आवाहन केले प्रास्ताविक सचिन निकम सुत्रसंचालन शाहीर कवी गायकर काका यांनी तर आभार अमोल निकम यांनी मानले, कार्यक्रमास सुहिरा पेट्रोल पंपाचे कर्मचारी, राष्ट्रीय विश्‍वगामी पत्रकार संघ पदाधिकारी व ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.