✒️प्रतिनिधी प्रतिनिधी(संजय कोळी)

दोंडाईचा(दि.6ऑक्टोबर):- रोजी शिंदखेडा तालुक्यातील देवी येथील आदीवासी भिल वस्तीत तसेच सतारे या गावातील आदीवासी टोकरे कोळी वस्तीत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण धुळे यांच्या वतीने वि.से.प्रा.सचीव न्या.व्ही यु डोंगरे साहेब यांच्या मार्गदर्शनाने कायदेविषय क मोफत कार्यशाला या कार्यक्रम घेण्यात आला….आदीवासी वस्तीत जाऊन विधी सेवा प्राधिकरण च्या वतीने गोरगरीब, दुर्बल,वंचीत घटकातील महीलांसाठी असलेल्या विविध मोफत कायदेविषयक सेवांची माहीती सामाजिक कार्यकर्ता गीतांजली कोळी यांच्या वतीने तसेच विधी सेवा विधिज्ञ यांच्या वतीने देण्यात आली….

या सुंदर उपक्रमाचे गावातील महिलांनी कौतुक केले.विधीसेवा प्राधिकरण धुळे या वतीने शिंदखेडा तालुक्यातील देवी,सतारे ह्या दुर्गम गावात हा चांगला उपक्रम गोरगरीब महीलांसाठी राबवण्यात आला… याबद्दल आदीवासी बांधवांनी समाधान व्यक्त केले.सौ गीतांजली कोळी वीरांगना झलकारी बाई कोळी स्री शक्ति सामाजिक संस्था.धुळे
महाराष्ट्र दारूबंदी महिला/ युवा मोर्चा
वाल्या सेना गृप खान्देश

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED