पुणे महानगरपालिकेतील १७०००/- सेवकांना महापौर व पक्ष नेत्यांच्या बैठकीत बोनस व सानुग्रह अनुदान व पाच वर्षे करार करण्यास मान्यता

30

✒️पुणे(पुरोगामी संदेश नेटवर्क)

पुणे(दि.6ऑक्टोबर):-पुणे महानगरपालिकेतील सर्व खात्यातील वर्ग १ ते वर ४, बालवाडी शिक्षिका व सेविका,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, शिक्षण विभाग प्राथमिक कडील रोजंदारी शिपाई व एकवट मानधनावर काम करणारे तसेच सर्व शिक्षा अभियान मध्ये काम करणारे ६६ कर्मचारी इत्यादी सर्व कर्मचारी याना बोनस व सानुग्रह अनुदान देण्याचेही मान्य करण्यात आले.

शिवाय २०२१ ते २०२५ असा पाच वर्षाचा लेखी करार देखील पुणे महानगरपालिका कामगार युनियन( मान्यताप्राप्त) बरोबर पाच वर्षाचा लेखी करार करण्यास देखील महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली उपमहापौर सुनिता वाडेकर, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते गणेश बिडकर,विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, शिवसेना गटनेते पृथ्वीराज सुतार, मनसे गटनेते साईनाथ बाबर, काँग्रेस पक्ष गटनेते आबा बागुल तसेच अरविंद शिंदे ,आरपीआय पक्षनेत्या मा. फर्जाना शेख व इतर सर्व पक्ष नेत्यानी एक मतानी मान्यता दिली. वेतनाच्या ८.३३% बोनस २०२१ या वर्षी १७०००/- (सतरा हजार रुपये), २०२२ या वर्षी १९०००/-! ( एकोणीस हजार रुपये ) २०२३ – या वर्षी – २१०००/- ( एकवीस हजार रुपये), २०२४ – या वर्षी २३०००/- ( तेवीस हजार रुपये), २०२५ या वर्षी २५०००/- ( पंचवीस हजार रुपये) सानुग्रह अनुदाना बरोबर विशेष बाब म्हणजे कोविडच्या कालावधीत काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना ३०००/- ( तीन हजार रुपये) विशेष भत्ता देण्याचेही मान्य केले.

तसेच सदर बोनसचा करणे संदर्भात युनियनचे अध्यक्ष कॉम्रेड उदय भट, कार्याध्यक्ष कॉम्रेड चंद्रकांत गमरे, कॉम्रेड प्रकाश हुरकडली, उपाध्यक्ष शोभा बनसोडे, संयुक्त चिटणीस मधुकर नरसिंगे, कॉम्रेड रोहिणी जाधव कॉम्रेड वैजनाथ गायकवाड, कॉम्रेड राम अडागळे, कॉम्रेड ओंकार काळे, काँग्रेस दीपक दंडूले, पीएमसी एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष प्रदीप महाडिक, जनरल सेक्रेटरी चंद्रकांत शितोळे, आशिष चव्हाण, अभियंता संघाचे सुनील कदम इत्यादी सर्व युनियनचे पदाधिकारी उपस्थित होते. तसेच युनियनचे अध्यक्ष कॉम्रेड उदय भट यांनी महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष सभागृह नेते व सर्व पक्षाचे गटनेते यांचे विशेष करून अभिनंदन केले शिवाय प्रशासनाच्या सर्व कार्याला पुणे महानगरपालिका कामगार युनियन व इतर संघटनांचे पदाधिकारी यांनी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.