✒️अशोक हाके(बिलोली ता.प्र.)मो:-9970631332

बिलोली(दि.6ऑक्टोबर):- तालुक्यातील
वन परिमंडळ बिलोली अंतर्गत बिट बामनी मौजे बडूर जि.प.शाळा येथे वन्य जीव सप्ताह निमित्त वर्ग 5 वी ते 7 वी मधील विद्यार्थ्यां मध्ये माझा आवडता वन्यप्राणी या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली.

प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास रोखपाचशे रुपये द्वितीय येणाऱ्या विद्यार्थ्यास तीनशे रुपये तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्यास दोनशे रुपये याप्रमाणे रोख बक्षीस व प्रमाणपत्र माननीय वनपरिक्षेत्र अधिकारी देगलूर निखिल हिवरे सर व वनपरिमंडळ अधिकारी फरीद शेख सर यांच्या हस्ते देण्यात आले.

व विद्यार्थ्यांना वन्य जीवनाबद्दल माहिती देऊन 0 प्राणी यांचे मानवी जीवनातील महत्व पटवून ज्ञान देण्यात आले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जिल्हा परिषद शाळा येथील सर्व शिक्षक वनरक्षक गिरीश कुरूडे वनरक्षक ज्ञानेश्वर मुसळे वनरक्षक आशाताई गायकवाड तसेच सर्व वनमजूर वन सेवक यांनी परिश्रम घेतले

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED