✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गडचिरोली(दि.6ऑक्टोबर):- शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोळकर स्थापित महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती गंगाखेडच्या नवीन कार्यकारणीची बैठक संपन्न झाली यावेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष विलासरावजी जंगले, कार्याध्यक्ष प्रा. डॉ.विठ्ठल घुले यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.

आनंद विहार निवासस्थानी नवीन कार्यकारिणी करतांना कार्यकर्त्यांना मार्गदर्शन झाल्यानंतर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या गंगाखेड शाखेच्या अध्यक्षपदी रामकिशन लटपटे, उपाध्यक्ष विष्णू काळे, कार्याध्यक्ष राजेश समुद्रे, प्रधान सचिव विलास जोशी, राहुल साबणे, विविध उपक्रम आनंद शिंदे, बुवाबाजी विरोधी संघर्ष व सोशल मीडिया प्रमुख प्रसेनजीत मस्के, कायदेविषयक सल्लागार अँ.आर.आर.गायकवाड, वैज्ञानिक जाणीवा प्रकल्प विष्णू मुंडे, कार्यवाहक सूर्यमाला ताई मोतीपवळे, इत्यादींची निवड सर्वानुमते करण्यात आली

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED