✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.7ऑक्टोबर):-तालुक्यातील मौजे खळी या गावाचे पुनर्वसन झालेले असून मौजे खळी या गावाचे सरपंच व ग्रामसेवक हे शासनाची दिशाभूल करून पुनर्वसन झालेले ठिकाणी विकसाचे काम न करता जुन्या गावातच कामे करत आहेत.मौजे खळी तालुका गंगाखेड या गावाचे पुनर्वसन 35 वर्षा पूर्वी झाले असून या गावास दोन वेळा पुरा मुळे गाव सोडावे लागले होते 2006 या वर्षी 100ते 150 कुंटूंबाला स्थलांतरीत केले होते या वर्षी 27व 29सप्टेंबर 2021गोदावरी नादिस पूर आला असता गावाचा संपर्क तुटला होता तसेच 01व 02अक्टोबर रोजी सुद्धा गावाचा संपर्क तुटला होता.

या वर्षी चार वेळा गावाचा संपर्क तुटला असता जुन्या गावातच काम करणणे योग्य आहे का? खळी गावाला पुराचा धोका असताना मा. तहसीलदार गंगाखेड यांनी काश्याच्या आधारे परवानगी दिली आहे याची योग्य ती उच्चस्तरिया चौकशी करून कार्यवाही करण्यात यावी अशायाचे निवेदन वामन रामभाऊ ढोबळे, आणि लक्ष्मण मुंजाजी सोन्नर यांच्या स्वक्षरी ने मा. तहसीलदार गंगाखेड यांना देण्यात आले.

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED