कोरपना मार्केटमध्ये सोयाबीन खरेदीचा शुभारंभ 6100 रुपये दरात खरेदी

26

✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)

जिवती(दि.7ऑक्टोबर):-सध्या पावसाने दडी मारल्याने शेतीच्या कामाला वेग आला बळीराजाने मोठया कष्टाने पिकवलेले अतिवृष्टी पाऊस अशा संकटातही शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची सुरक्षा करीत शेतीचे उत्पादन घेतले चालू हंगामातील नवीन सोयाबीन कोरपना मार्केटमध्ये विक्रीसाठी शेतकरी आणीत आहे आज दिनांक 7 .10. 202 I रोजी शेतकऱ्यांनी नवीन सोयाबीन विक्रीसाठी आणले होते दुर्गाडी येथील शेतकरी सुनील खडसे यांनी प्रथमआणलेले सोयाबीन 6100 रुपये दरात देरकर ट्रेडिंग कंपनी यांनी खरेदी करून खरेदीचा शुभारंभ केला यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आबिद अली यांनी शेतकरी सुनील खडसे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला यावेळी शेतकरी प्रभाकर मोहितकर सुनील देरकर शांताराम देरकर कृणाल चिमुरकर उपस्थित होते.

कोरपना परिसरात यावर्षी सोयाबीनचा पेरा वाढला असून कोरपना मार्केटमध्ये नवीन सोयाबीन ची आवक वाढली असल्याने शेतकऱ्यांची दिवाळी दसरा हे सण जवळच आल्याने शेतकऱ्यांनी नवीन उत्पदित सोयाबीन विक्रीस आणीत आहे पावसामुळे मूग उडीद या पिकाला मोठा फटका बसला मात्र सोयाबीनचे भाव घसरल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी दिसून येते शेतीच्या खर्चावर आधारित उत्पादन होत नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक परस्थिती वाईट मार्गाने जात आहे हे बदलते हवामान वाढते तापमान यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात सातत्याने घट होत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मजुराचे संकट शेतकऱ्या पुढे एक आव्हान उभे ठाकले आहे