🔹धम्मध्वज सरकारी कचेरीत फडकावन्यासाठी रिपाई डेमोक्रॅटिक चे आवाहन

✒️मुंबई(पुरोगामी संदेश नेटवर्क)

मुंबई(दि.8ऑक्टोबर):- भारत देशातील तमाम धम्मप्रेमी बांधवांनी आप आपल्या तहसीलदार व जिल्हाधिकार्या मार्फत राष्ट्रपती व प्रधानमंत्र्यांच्या नावे निवेदने देण्यात यावीत असे आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक चे राष्ट्रीय महासचिव डॉ. राजन माकणीकर यांनी केले आहे.*

यावर्षी पासून भारत सरकारच्या आदेशाने दरवर्षी धम्म चक्र प्रवर्तन दिनी सर्व राज्यांच्या सरकारणे सर्व सरकारी कचेरीवर पंचशील धम्म ध्वज फडकविण्याचे आदेश काढावेत अश्या मागणीचा मेल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक च्या माध्यमातून विद्रोही पत्रकार डॉ. राजन माकणीकर यांनी पाठवला आहे.

सदर मागणी पूर्णत्वास येण्यासाठी समाजातील प्रत्येक आंबेडकरवादी बुद्धिजीव व धम्मप्रेमींनी देशातील सर्व सरकारी कचेरीवर धम्म ध्वज फडकाविण्यात यावा अश्या आशयाचे निवेदन मा. तहसीलदार किंवा मा. जिल्हाधिकार्यांमार्फत भारताचे महामहिम राष्ट्रपती व मा. प्रधानमंत्री यांना निवेदन देण्यात यावे.

कोणताही दुजाभाव श्रेय ना लाटता फक्त निस्वार्थ भावना ठेवून व आंबेडकरी विचारांचे अनेक राजकीय पक्ष बौद्धांच्या विविध संस्था व त्यांच्या प्रमुखांनी सदर मागणी साठी स्वयंप्रेरणेने पुढे येऊन सरकारी काचेरीवर धम्म ध्वज फडकत राहावा यासाठी प्रयत्न केला तर नक्कीच ही रास्त व न्यायिक मागणी पूर्व होऊ शकेल असा आशावाद ही भारतीय बौद्ध महासभेचे माजी केंद्रीय शिक्षक व श्रामनेर डॉ. राजन माकणीकर यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र, मुंबई, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED