झाडीबोलीच्या बल्लारपूर तालुकाप्रमुखपदी प्रशांत भंडारे यांची निवड

42

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.8ऑक्टोबर):-झाडीबोली साहित्य मंडळ बल्लारपूर तालुका शाखेच्या अध्यक्षपदी कवी प्रशांत भंडारे यांची निवड करण्यात आली. नुकत्याच बल्लारपूर येथील मंडळाच्या कार्यक्रमात कवी भंडारे यांच्या नांवाची अधिकृत घोषणा करण्यात आली. २०१७ पासून आजवर या शाखेचे उत्तम कार्य तालुकाप्रमुख म्हणून प्रा. श्रावण बानासुरे यांनी केले.त्यांचा कार्यकाळ संपल्याने याठिकाणी भंडारे यांची निवड करण्यात आली. आमडी (कोठारी ) निवासी आणि व्यवसायाने शिक्षक असलेले प्रशांत भंडारे हे बोलीसाहित्यचे चांगले जाणकार असून शिघ्रकवी म्हणूनही परिचित आहे.

मुळातच काव्यलेखन,चित्रकलेची आवड असणारे कलावंत आहेत.या पूर्वी त्यांना शिव छत्रपती उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार मिळालेला आहे.त्यांच्या शैक्षणिक व साहित्य सेवेची दखल घेऊन झाडीबोली साहित्य मंडळ चंद्रपूरच्या वतीने यावर्षीचा झाडी शब्दसाधक शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले.युनिसेफ व भारत सरकार प्रणित खेळाद्वारे शिक्षण या उपक्रमात राष्ट्रीय पातळीवर प्रशिक्षक म्हणून काम केलेले आहे. त्यांचा कवडसा हा काव्य संग्रह प्रकाशित होण्याच्या मार्गावर आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील प्रसिद्ध गझलकार म्हणून नावलौकिक मिळविले आहे .लवकरच तालुका शाखेची घोषणा अधिकृतपणे करण्यात येईल. निवड झाल्याबद्दल प्रशांत भंडारे यांचे ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर , चंद्रपूर जिल्हाध्यक्ष कवी अरूण झगडकर ,रामकृष्ण चनकापुरे ,लक्ष्मणराव खोब्रागडे, दिलीप पाटील,सुनील पोटे, विरेनकुमार खोब्रागडे आदींनी अभिनंदन केलेले आहे.