शाळा बंद पण शिक्षण सुरू…

54

देशावर कोरोनाचे संकट डोकावत असताना विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा प्रश्न डोक्यात आला.आपल्या देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य शासनाच्या निर्देशानुसार 22 मार्च 2020 पासून संपूर्ण शाळा तात्पुरत्या स्वरूपात काही काळासाठी बंद करण्यात आल्या. शाळा सुरू होण्याची काही संकेत दिसत नव्हते. मुलांच्या शिक्षणाच काय होणार असा प्रश्न माझ्या समोर आला. बऱ्याच कालावधी पासून मुल शाळेपासून दूर होती. यावर उपाय म्हणून शाळा बंद शिक्षण सुरू ही संकल्पना डोक्यांत आली. व मी ही संकल्पना माझा सहकारी मित्र गौतम उराडे सर यांना सांगितली.दोघाच्या संकल्पनेतून व केंद्रप्रमुख महल्ले साहेब यांच्या सहकार्याने पुढे नेली.
संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरू झाला.लॉक डाऊन नंतरच्या काळात ग्रामीण भागातील शाळा आणि तिथली मूल यांचं शिक्षण कस पूर्ण होणार हा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न लक्षात घेऊन मी,उराडे सर व केंद्रप्रमुख महल्ले साहेब आम्ही तिघांनी पुढाकार घेऊन गावात गेलो.गावात जाऊन पालकांशी व विद्यार्थ्यांशी संवाद साधून अडचणी समजून घेतल्या. शासनाने विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय उपलब्ध करून दिला असला तरी विद्यार्थ्यांकडे स्मार्ट फोन, स्मार्ट टीव्ही,रेंज कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे पूर्ण विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण घेऊ शकत नव्हते. या कठीण प्रसंगी अफलातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला.

ज्या मुलाकडे स्मार्ट फोन आहे.त्या विद्यार्थ्यांना व्हाट्सएपच्या माध्यमातून messege करत होतो तर ज्या मुलाकडे स्मार्ट फोन नाही त्यांना text messege करत दररोजचा स्वाध्याय देणे सुरू केले. तसेच कॉम्प्युटर वर दररोजची प्रश्नावली तयार करून ती सर्व विद्यार्थी पर्यंत पोहचविणे असे विविध उपक्रम राबविण्याचा प्रयत्न केला.या उपक्रमामूळे मुले दररोज अभ्यास करायला लागली.तसेच दर सोमवार, मंगळवार ला विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन स्वाध्याय तपासणी केली. ज्या मुलाना अडचणी येत होत्या त्यांना प्रत्येक्ष मार्गदर्शन करत होतो.त्यांना diksha app ची माहिती देणे. दीक्षा अँप द्वारें स्वाध्याय सोडविणे.ज्या मुलाकडे अँड्रॉइड मोबाइल आहे त्यांना google meet द्वारे मार्गदर्शन करणे.त

सेच सह्याद्री वाहिनी वरील टिलिमिली कार्यक्रम पाहण्यास सांगत होतो.विद्यार्थी तो कार्यक्रम न चुकता पाहत होते.काही विद्यार्थी व पालकांकडे अँड्रॉइड मोबाइल नाही ही बाब लक्षात घेऊन समस्या तिथे मार्ग,गरज तिथे शोध या म्हणीप्रमाणे विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टळावे व शैक्षणिक सातत्य असावे या साठी विविध प्रयत्न केले.माझ्या या प्रयत्नांने विद्यार्थी घरी राहून घरातील उपलब्ध शैक्षणिक साहित्याचा वापर करून अध्ययन करीत आहेत. शाळा बंद शिक्षण सुरू या उपक्रमामूळे मुलांच्या अनदासोबतच शैक्षणिक प्रगतीत सातत्य व आमूलाग्र बदल दिसत आहे.या शाळा बंद शिक्षण सुरू उपक्रमाला माझे सहकारी मित्र गौतम उराडे, केंद्रप्रमुख महल्ले साहेब यांचे खूप सहकार्य मिळाले. तसेच अभ्यासगट गोंडपीपरी यांच्या समूहाचे सुध्दा खूप सहकार्य मिळाले.

✒️लेखक:-श्री. विठ्ठल किसन गोंडे(विषय शिक्षक)
जि प उ प्राथमिक शाळा विठ्ठलवाडा प स गोंडपीपरी जि चंद्रपूर.