✒️तलवाडा प्रतिनिधि(शेख आतिख)

गेवराई(दि.8ऑक्टोबर):- तालुक्यातील तलवाडा येथील महाराष्ट्र ग्रामिण बँक शाखेच्या मनमानीला शेतकरी वर्ग पुर्णपने वैतागला असुन तलवाडा परिसरातील जि गावे या शाखे कडे दत्तक आहेत त्या गावातील नागरिकांना गेेल्या चार महिन्या नुसते टोकन देऊन झुलवत ठेवण्याचे कृत्य या शाखेच्या पदाधिका-या कडुन वारंमवार घडत आसल्याने मिरगावचे माजी सरपंच तथा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे गेवराई तालुका संघटक भाऊसाहेब माखले यांनी या शाखेच्या दुटप्पी भूमिके संदर्भात अमरण ऊपोषणाचा इशारा प्रस्धिस दिलेल्या पत्रकाच्या माध्यमातुन दिला आहे.

पत्रात भाऊसाहेब माखले यांनी म्हण्टले आहे की आम्ही गेल्या चार महिन्या पासुन तलवाडा शाखेत प्रस्ताव दाखल केलेले आसतांना देखील शासनाने दत्तक गावातील शेतक-यांना तात्काळ पिक कर्ज देण्याचे आदेश आसतांना देखील या शाखेच्या पदाधिका-या कडुन शेतकरी बांधवांना येरझ-या मारने नित्याचेच आसल्याने दिं 13/10/2021 पर्यंत तलवाडा शाखेच्या पदाधिका-यांनी दखल घेऊन पिक कर्जाची पुर्तता न केल्यास मिरगाव, पांगुळगाव, पांढरी, भोगलगाव, राहेरी, गंगावाडी, चव्हाणवाडी, गोविंदवाडी येथील शेतकरी बांधवांना सोबत घेऊन अमरण ऊपोषणाचा इशारा प्रस्धिस दिलेल्या पत्रकाच्या माध्यमातुन भाऊसाहेब माखले यांनी तलवाडा महाराष्ट्र ग्रामिण बँक शाखेच्या पदाधिका-यांना दिला असुन शेतक-यांचे काही विपरीत परिणाम समोर आल्यास बँक प्रशासन यास जबाबदार राहील आसेही भाऊसाहेब माखले यांनी म्हण्टले आहे.

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED