नायगांव पोलिसांचा अजब कारभार-फिर्यादीनाच अरेरावीची भाषा करून केला पदाचा गैरवापर

70

✒️नायगाव(पुरोगामी संदेश नेटवर्क)

नायगांव(दि.8ऑक्टोबर):-नायगांव पोलीस ठाण्यातील संबंधित पोलीस अधिकारी – कर्मचारी आपल्या अधिकारांचा व पदांचा गैरवापर करुन बेकायदेशीरपणे बळाचा वापर केले, असल्याची तक्रार नायगांव येथील सामाजिक कार्यकर्ते- शिवानंद दत्तात्रय पांचाळ यांनी लेखी निवेदनाद्वारे पोलिस अधीक्षकांकडे केली आहे, माझे नातेवाईक येउन मला बेकायदेशीरपणे पैशाची मागणी करत दमदाटी देत असल्याची सदरील माहीती मी लोकशाही मार्गाने पोलिस ठाण्यात दूरध्वनीद्वारे घटने नुसार आरोपींविरुद्ध प्रतीबंधात्मक कारवाई करून त्वरित संरक्षण मिळणेस केली, पण झाले उलटेच मी फिर्यादी असून देखील मलाच अधिकारांचा व पदांचा गैरवापर करत अनावश्यक असतांना बेकायदेशीरपणे दहशत करून शिवीगाळ केली.

माझा हक्क व अधिकारांची पायमल्ली केली, माझ्यावर जाणीपूर्वक अन्याय केला, नायगांव पोलिसांचा हा अजब कारभारास पोलीस अधीक्षक यांनी आळा घालतील काय असा प्रश्न करून आपणास न्याय मिळावा असे निवेदन सामाजिक कार्यकर्ते शिवानंद पांचाळ यांनी दिले आहे, वृत्त असे मी गेल्या चार-पाच वर्षापासून गरजू लोकांना मदतीचा हात देऊन आपले सामाजिकत्व पाळले यासोबत माणसात व पोलिसात वेगळेपण नसावे माणसाच्या संरक्षणासाठी पोलीस आहेत, कोरोना लॉकडाऊन काळात पोलीस व डॉक्टर्स ,नर्स ,परिचारिका व ईतर क्षेत्रातील बांधव भगिनींनी महत्वाची भूमिकाही बजावली, मी सामाजिक कार्यकर्ता या नात्याने भारावून जाऊन त्यांचा सन्मान केला, असे माझे दैनंदिन काम चालत असले तरी माझे कौटुंबिक नातेवाईक माझ्या घरी आले, मला अमुक-तमुक करायचे आहे म्हणून एक लाख रुपयाची मागणी केली.

तेव्हा मी नकार दिला असता त्यांनी मला उद्धटपणाची भाषा करत जीवे मारण्याची धमकी दिली, म्हणून मी रीतसर नायगांव पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवली व न्याय मागितला पण पोलीस कर्मचारी वर्गातील आरोपी विरुद्ध योग्य ती कारवाई करण्यापेक्षा दि.६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ठीक नऊ वाजता मी घरी कुटुंबीयांत असता रात्रीच्या कार्यसेवत असणारे सदर पोलीस स्टेशनचे कर्मचारी श्री वाघमारे यांनी उद्धट पणाची भाषेचा वापर करीत पोलीस ठाण्यात आणले हा अजब प्रकार पाहून मी चकित झालो असले तरी माझी समाजात असलेली नैतिकता, इज्जत, प्रेम धुळीस सदर पोलिसांनी मिळवली असल्याने मला खऱ्या अर्थाने न्याय मिळावा यासाठी पोलीस अधीक्षक यांच्याकडे रीतसर सामाजिक कार्यकर्ते शिवानंद पांचाळ यांनी लेखी निवेदन देऊन सदर पोलीस कर्मचारी वाघमारे यांच्या विरुद्ध काय कारवाई करतील मी न्यायाच्या प्रतीक्षेत आहे, अशा भावना आमच्या प्रतिनिधीशी बोलताना पांचाळ यांनी व्यक्त केले,