आरोग्य विभागाच्या परीक्षेला जाण्यास मोफत सोय करा- मनसे विद्यार्थी सेना दोंडाईचा

25

✒️विशेष प्रतिनिधी(संजय कोळी)

दोंडाईचा(दि.8ऑक्टोबर):- आरोग्य विभागाच्या आणि राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या निर्णयाने आर्थिक फटका उमेदवारांना बसला आहे त्यामुळे नुकसान भरपाई व परीक्षा दिवशी परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थांना परीक्षा केंद्रापर्यंत जाण्यास मोफत सोय करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेने कडून करण्यात आली.आरोग्य विभागा कडून घेण्यात येणारी गट क व गट ड या जागांसाठी २५ सप्टेंबर व २६ सप्टेंबर २०२१ रोजी घेण्यात येणारी परिक्षा हि ऐनवेळी रद्द करण्यात आली.

विद्यार्थीयांना त्यांचा मुक्कामाचा, राहण्याचा,जेवणाचा, प्रवासाचा खर्च त्यांना देण्यात यावा तसेच अनेक गर्भवती परीक्षार्थी पण होत्या ज्या त्रास सहन करत परिक्षा देण्यास आल्या होत्या मात्र सरकार ने कोणत्याही विचार न करता कोणच्याही वेदना न जाणता सदर परीक्षा २४ सप्टेंबर २०२१ रोजी रात्री १० वाजताच्या दरम्यान एक पत्रक प्रसिद्धी करत भरती प्रक्रिया पुढे ढकलल्याचे जाहीर केले.परीक्षेला अवघे १०-१२ तास शिल्लक असताना परीक्षा ऐनवेळी रद्द करण्यात आली तसेच महाराष्ट्रातून खेड्या-पाड्यातील विद्यार्थ्यांनी पुणे, मुंबई, औरंगाबाद, नाशिक या मोठ्या शहरात भरतीच्या जागा जास्त असल्यामुळे फॉर्म भरले होते. ते १-२ दिवस आधीपासूनच मिळेल त्या वाहनाने परीक्षा देण्यासाठी निघून गेले होते. आपण परीक्षा स्थगितीचा निर्णय किमान ८ दिवस आधीच घ्यायचे असताना परीक्षा ऐनवेळी रद्द केली.

एकतर कोरोना मुळे प्रचंड आर्थिक मार झेलत असलेले तरुण तरुणी यांना शासनाच्या चुकीमुळे पुन्हा एकदा आर्थिक मानसिक शारीरिक प्रचंड त्रास झाला आहे. तरी सदर परीक्षा रक्कम विद्यार्थ्यांना परत करण्यात यावी व त्यांच्या मूळ गावापासून परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी मोफत बस सेवा उपलब्ध करून देण्यात यावी असे निवेदन म.अप्पर तहसीलदार सो यांना देण्यात आले. मनविसे च्या वतीने मनविसे जिल्हाध्यक्ष ऍड.प्रसाद देशमुख,जिल्हासचिव गौरव गीते यांच्या मार्गदर्शनाने.यावेळी मनविसे शहाराध्यक्ष राहुल करनकाळ, मनविसे उपाध्यक्ष प्रदीप भोई ,अविनाश पाटील पवन ठाकूर,राहुल रामोळे,ध्रुव ठाकूर, सौरभ ठाकूर रविराज मराठे महाराष्ट्र सैनिक राधे बडगुजर, निलेश महाले मयूर ठाकूर व मनसैनिक उपस्थित होते.