🔹सेतु मध्ये नागरीकांची आर्थिक लुट, कामात विलंब थांबवा

🔸एमपीजे संघटनेचे तहसीलदारांना निवेदन

✒️सिध्दार्थ दिवेकर(तालुका प्रतिनिधी,उमरखेड)मो:-9823995466

उमरखेड(दि.8ऑक्टोबर):-नविन शिधा देणे, शिधापत्रीकेत नाव वाढविणे,व कमी करणे,शिधापत्रीकेत एकक वाढविणे,हरविलेल्या शिधापत्रीके ऐवजी दुय्यम शिधापत्रिका देणे, फाटलेल्या – खराब झालेल्या शिधापत्रिके ऐवजी दुय्यम पत्रिका देणे, शिधापत्रिक रद्द करून तसे प्रमाणपत्र देणे, रूग्णांना दवाखान्याचे प्रमाणपत्र देणे,नवीन डाटाइंन्ट्री करणे, तसेच जुन्या डाटा इन्ट्रीमध्ये नाव समाविष्ट करणे व कमी करणे, आदि विविध कामे तहसील कार्यालयामार्फत होत होते.

पण ही कामे तहसील ने सेतुला दिलेली आहेत.
वरील सर्व कामासाठी निश्चित कालमर्यादा शासन निर्णय क्र. साविव्य -१०९९ / प्र . क्र .८७४५ / ना . पु.२८ दि .२५ एप्रिल २००० नुसार निश्चित आहेत.हया सर्व कामाचा कालावधी १ते १० दिवसाचा आहे.

परंतु साध्या कामाला संतु कर्मचारी महिना महिना लावत आहेत. म्हणून मुव्हमेन्ट फॉर पीस अँन्डजस्टीस या अन्नसुरक्षे संबंधी कार्य करणाऱ्या संघटनेतर्फे शासकीय परिपत्रकानुसार शिधा संबंधी विविध कामाच्या कालमर्यादा चे वेळ फलक व विविध कामाचे दर फलक दर्शनी भागावर लावणे बंधनकारक करावे अश्या मागणीचे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हणटले आहे की, सेतु व्यवस्थापक कामाचे शासनाने निश्चित केलेल्या फी नुसार दर न घेता अवाढव्य शुल्क कोणतीही पावती न देता वसुल करत आहेत. यामुळे नागरीकांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत असून नागरिक त्रस्त झाले आहेत.

निवेदनाव्दारे मागणी करण्यात आली की, सेतुचे विविध कामाचे शासकीय दरानुसार फी घेण्यासाठी त्यांना सक्त ताकीद करावी-तसे फलक सेतु वर लावण्यात यावे.-सेतु संबधी तक्रारीसाठी फलकावर तक्रार निवारण अधिकाऱ्याचा फोन नंबर नमुद करण्यात यावा.

अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. नागरिकांना न्याय न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा पण देण्यात आला.निवेदन देतांना एमपीजेचे अध्यक्ष डॉ. फारूक अबरार, उपाध्यक्ष इरफान , मिनाज अहेमद, प्रकाश चव्हाण आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

महाराष्ट्र, मागणी, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED