सीएमपीडीआयचे समभाग विकण्याचा कामगारांकडून जोरदार विरोध – देशविरोधी निर्णय

28

🔹आयटक आणि बिएमएस चे क्षेत्रीय सिजीएम कार्यालयावर धरणे आंदोलन

🔸घोषणांनी वेकोलि परिसर दणाणला

✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)

जिवती(दि.8ऑक्टोबर):-संयुक्त खदान मजदूर संघ आणि भारतीय कोयला खदान मजदूर संघ यांनी सास्ती टाऊनशिप येथील बल्लारपूर क्षेत्रीय मुख्य महाव्यवस्थापक यांचे कार्यालयावर धरणे दिले. सीएमपीडीआय चे दहा टक्के समभाग विकण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचा आक्रमक विरोध या दोन्ही कामगार संघटनांनी केला आहे. आज जोरदार घोषणा देत कामगारांनी हा परिसर दणाणून सोडला.बिएमएस व आयटक या दोन्ही कामगार संघटनांनी गेल्या चार दिवसापासुन सरकारच्या सीएमपीडीआय शेअर्स विकण्याचा निर्णय मागे घ्या, या मागणीसाठी कोळसा खाण परिसरात द्वार सभेद्वारे जागृती केली होती. बिएमएसचे केंद्रीय महामंत्री सुधीर घूरडे, आयटकचे केंद्रीय अध्यक्ष नंदकुमार म्हस्के आणि जनरल सेक्रेटरी जोसेफ यांनी यासंदर्भातील केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांची माहिती कामगारांना दिल्याने मोठ्या संख्येने कामगार या आंदोलनात सहभागी झाले.

आज तीन वाजता बिएमएस कामगार संघटनेचे नेते क्षेत्रीय दवाखान्याजवळ एकत्र येवून मोर्चाने सीजीएम कार्यालयावर आले. तेथे गेटवर अडविण्यात आल्यावर कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार व कोल इंडिया च्या विरोधात घोषणा दिल्या. त्यानंतर शिष्टमंडळाने मुख्य महाप्रबंधक संचालक सी.पी.सिंग मागण्यांचे निवेदन दिले. या बिएमएस च्या आंदोलनाचे नेतृत्व केंद्रीय महामंत्री सुधीर घुरडे,जोगेंद्र यादव, पी.बी.पाटील,विवेक अल्लेवार, शांताराम वांढरे,अनिल निब्रड,बादल गर्गेलवार,एच.एम.भंडारी,समस्या यंकापेल्ली यांनी केले.
यानंतर पाच वाजता आयटक संघटनेचे शेकडो कामगार, कार्यकर्ते यांनी गेट पासून मोर्चाने मुख्य महाप्रबंधक कार्यालयावर आले. तेथे जोरदार घोषणाबाजी झाली. यानंतर निवेदन ऑपरेशन महाप्रबंधक यांना देण्यात आले.

यावेळी बोलतांना मधुकर ठाकरे यांनी केंद्र शासनाच्या कामगार विरोधी घोषणांचा जोरदार विरोध करीत हा समभाग विकण्याचा निर्णय देशविरोधी असल्याचे सांगितले. या आंदोलनाचे नेतृत्व आयटकचे क्षेत्रीय अध्यक्ष मधुकर ठाकरे, रायलिंगु झुपाका, दिलीप कनकुलवार,शिरपुरम रामलू, पुरुषोत्तम मोहूर्ले,दिनेश जावरे,रवी डाहूले,साईनाथ ढवस,पंकज झाडे, आनंद झाडे,निरंजन देवगडे,दिनेश पारखी,भद्रय्या नातारकी, रावलसिंग रंधावा,सातूर तिरुपती यांनी केले.