मान्यवर कांशीरामजी यांनी बहुजन समाजाला शासनकर्ती जमात बनविले

29

मान्यवर बहूजननायक कांशीरामजी यांच्या  स्मृतिदिन निमित्त अभिवादनपर लेख..

 

         भारतीय राजकारण आणि समाजकारणात होऊ शकत नाही ! अशा अशक्य बाबींना *विचारधारा आणि कठोरपणे अंमल* यातून शक्य करणाऱ्या महात्मा जोतीराव फुले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नंतरचा बहुजननायक म्हणून मान्यवर कांशीरामजी होत.

कांशीरामजी यांनी समाजाला जागृत आणि संघटीत करण्याचा विडा उचलला. त्यांना जाणीव होती की,जातीयवादावर आधारित या विषमतेच्या व्यवस्थेला बदलणे सोपे नाही.पूर्ण विषमतेला पूर्ण समतेमध्ये बदलण्यासाठी संपूर्ण समर्पणाची गरज आहे.खरी काम करण्याची चिकाटी ,निष्ठा,प्रामाणिकपणा आणि संघटितशक्तीचा योग्य दिशेने उपयोग केला तरच या विषमतावादी व्यवस्थेला मुळासाहित उपटून टाकता येईल.

मान्यवर कांशीरामजी यांचा जन्म 15मार्च 1934 ला पंजाब राज्यातील रोपड जिल्ह्यात खवासपूर या गावात झाला.त्यांच्या आईचे नाव बिशनकौर तर वडिलांचे नाव हरिसिंह होते. त्यांचे कुटूंब हे शीख धर्माचे रवीदासिया (चांभार)जातीचे होते. प्राथमिक शिक्षण ,माध्यमिक शिक्षणानंतर त्यांनी उच्च शिक्षण रोपड येथेच पूर्ण केले.त्यांना सत्याची चाड आणि  अन्यायाची चीड  होती.5 वी ला असतांना त्यांनी डोक्यावरील बुचडा सारखे असनारे सर्व केस घरच्यांचा विरोध असतानाही कापून घेतले.तसेच महाविद्यालयात असतांना त्यांना चित्रपट अभिनेता म्हणून प्राचार्यसह निर्माता यांच्याकडून संधी आली होती,ती त्यांनी नाकारली. बी एस्सी नंतर त्यांनी डेहराडून येथील स्टॉप कॉलेज येथे प्रवेश घेतला. केंद्रीय लोकसेवा आयोगाची तयारी करत होते. 1958 ला केंद्रीय सेवेत पुणे येथिल आयुध निर्मानी कारखाना सैनिकी विभागात वरिष्ठ ‘संशोधन अधिकारी’म्हणून रुजू झाले.

**दिनाभानाची चिंगारी** 
1964 च्या दरम्यान कांशीरामजी यांच्या जीवनाला कलाटणी मिळाली.कारण पुणे येथील कार्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त असणारी सुट्टीचे नियोजन हे स्थानिक प्रमुखअधिकारी यांनी रद्द केले.त्यामुळे कार्यालयातील बहुजन कर्मचारी यांनी त्यास विरोध केला.त्यावेळी अधिकारी याने सुट्टी पाहिजे की नोकरी पाहिजे यातून एक ठरवा.त्यावेळी कर्मचारी मागे हटले.परंतु त्यातील एक जो कामगार चतुर्थ श्रेणी कर्मचारी दिनभाणा याने नोकरी ही पाहिजे आणि 14 एप्रिलची सुट्टी ही पाहिजे,अशी भूमिका घेतली.तो कर्मचारी कल्याण समितीचा प्रतिनिधी होता.त्याला सी रामचंद्रन या अधिकाऱ्याने तू भंगी असून राजस्थानचा आहेस,इथल्या उठाठेवी,जयंतीचे काय देणे घेणे! यावरून दोघांत खडाजंगी झाली.एकतर नोकरी सोड नाहीतर जयंती सुट्टीची मागणी ! त्याने दोन्ही पाहिजेच यावर त्याला निलंबन नोटीस दिली. कांशीरामजी तिथे आले.त्यानी प्रकरण समजून घेवून दिनाभाना ची बाजू घेतली.त्यांच्यात झालेल्या संवाद यातून ते प्रभावित झाले.त्यांनी कोर्टापर्यंत दिनाभाना यांना मदत केली.त्यांच्या सोबत डी के खापर्डे ही होते. तसेच कमिशनर,संरक्षणमंत्री पर्यंत प्रकरण नेले.जयंतीला सुट्टी आणि दिनाभना यांना न्याय मिळवून दिला.ज्या डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्यासाठी याने नोकरी पणाला लावली त्यांच्या विषयी माहिती घेण्याची उत्सुकता 

 कांशीरामजी यांना होती. डी के खापर्डे यांनी 18मार्च1956चे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे आग्रा येथील’ मुझे पढे लिखे लोगोने धोका दिया है, हे एकमेव भाषणं प्रत्यक्ष ऐकले होते.ते चतुर्थ श्रेणी कर्मचारी होते. त्यांनी कांशीरामजी यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर लिखित
“अनहीलेशन ऑफ कास्ट” हे पुस्तक वाचायला दिले. हे पुस्तक त्यांनी 11 वेळा वाचले.आणि त्यांच्यात प्रचंड ऊर्जा निर्माण झाली. त्यांच्या जीवनाला एकदम कलाटणी मिळाली.त्यांनी मग व्यवस्था समजून घेवून घेतली.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील भारत घडविण्यासाठी त्यांनी स्वतःला झोकून दिले.
3.घर,लग्न,कुटुंब,नाते यांचा त्याग:- 
कांशीरामजी यांच्या घरी मुलगा चांगला केंद्र सरकारची मोठया पदाच्या नोकरीला आहे म्हणून एका आमदाराच्या मुलीची सोयरीक आलेली होती.कुटुंबातील सर्वांची इच्छा होती,मन वळविण्याचे खूप प्रयत्न केले.परंतु कांशीरामजी यांनी लग्न करण्यास नकार दिला.त्यांनी मी लग्न करणार नाही,माझं लग्न आता बहुजन समाजसोबत झालं आहे.त्यानंतर त्यांनी 1965ला आईला 24 पानाचे एक पत्र पाठवून त्यात जीवनाचे ध्येय सांगितले. 5 मोठे निर्णय घेतले.
“1.मी घरी नाही जाणार.परिवारातील विवाह,मृत्यू अशा कोणत्याही कार्यासाठी मी घरी जाणार नाही.

2.मी नोकरी करणार नाही.

3.मी लग्न करणार नाही.बहुजन समाज हाच माझा परिवार असेल.

4.माझे कोणतेही बँक खाते नसेल,तसेच कोणतीही वैयक्तिक नावावर संपत्ती नसेल.

5.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यासाठी प्राणाची बाजी लावून ते पूर्ण करील.

 आणि हो वास्तव 1983 ला वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांनी अंत्यसंस्कार यासाठी सुध्दा घरी गेले नाही.1965 पासून ते पुन्हा नोकरीच्या ठिकाणीही गेले नाही.त्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंदोलनातील त्यांच्या शिकलेल्या लोकांकडून खूप अपेक्षा होत्या,परंतु त्यांनी त्या पूर्ण केल्या नाहीत. त्याबाबीवर मान्यवर कांशीरामजी यांनी काम करायला सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी
 दिनाभना चालवीत असलेले एस.सी.,एस.टी.एम्प्लॉयइज वेलफेअर असोसिएशनचे काम हाती घेतले.असे अधिकारी, कर्मचारी विविध प्रकारच्या कार्यालयात आहेत,संख्या निर्धारित करून त्यांच्यात जागृतीसाठी, संघटित करण्यासाठी  काम सुरू केले.त्यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली.

4.बामसेफ, डी एस 4:-
देशभरातील बहुजन समाजातील कर्मचारी यांच्यात जागृती घडवून त्यांचे सामाजिक संघटन म्हणून राष्ट्रीय पातळीवर 

मान्य कांशीरामजी (पंजाब),दीनाभाना (राजस्थान) आणि  डी के खापर्डे (नागपूर) यांनी एकत्र येवून बामसेफ BAMCEF 

एस सी ,एस टी,ओबीसी,आणि मायनौरीटी एम्प्लॉइज फेडरेशन ची यांनी 6डिसेंबर1978 ला दिल्ली येथे स्थापना केली.

बामसेफच्या माध्यमातून देशभरात सुशिक्षित लोकात आणि कर्मचाऱ्यांचे जाळे निर्माण झाले. 

बहुजन समाजाच्या अपमानाचे विश्लेषण करतांना, तुमचा जो अपमान होत आहे,त्याचे एकमेव कारण म्हणजे आम्ही संघटीत नाही.उपजातीमध्ये विभागल्या गेलो आहोत. जागृत नाही,संघर्ष करत नाही.समाजाला सन्मानाची वागणूक मिळावी असे वाटत असेल तर सुशिक्षित लोकांनी समाजाला नेतृत्व प्रदान करावे आणि समाजासाठी तन -मन -धनाने पुढे यावे.समाजात ज्या उपजाती आहेत, त्यांच्यात एकोपा व जागृती करून त्यांना संघर्षासाठी तयार करावे लागेल,तरच समाजाचे कल्याण होईल.

 कर्मचारी संघटन हे रस्त्यावर उतरून संघर्ष करू शकत नाही,त्याला मर्यादा येतात. बहुजन समाजातील लोकांवर होणाऱ्या अन्याय अत्याचार याला आवर घालण्यासाठी संघर्ष करू शकतील अशा लोकांचे संघटनची आवश्यक आहे. म्हणून सर्व मागासवर्गीय आणि अल्पसंख्याक समुदाय यांना एकत्र करून 1970 ला D S 4 दलित शोषित संघर्ष समिती स्थापना केली.DS4 प्रचंड प्रमाणात प्रभावीपणे काम करत होते.समाजात एक शक्तिकेंद्र म्हणून DS4 ची ओळख निर्माण झाली. 

पुणे येथे आर पी आय चे ते सक्रिय कार्यकर्ते होते.त्यांनी त्यावेळी सपाच्या मदतीने आर पी आय चा महापौर भाऊसाहेब चव्हाण यांना बनविले होते.दादासाहेब गायकवाड यांनी आर पी आय  व काँग्रेस 1971च्या लोकसभेच्या जागा अपमानजनक युतीमुळे

 ( 521जागांपैकी 520 कॉग्रेस आणि फक्त 1 जागा आर पी आय) ही युती मान्य नसल्याने त्यांनी आर पी आय चा सक्रिय सदस्य पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी आपली कार्यगती आंदोलन उत्तरप्रदेश या मोठ्या राज्याकडे नेले.

6 डिसेंबर1981 ला डीएस4 अंतर्गत महिला,छात्र विंगची स्थापना केली.

बहुजन समाजातील दलाल राजकीय दलाल,एजेंटगीरी यावर परखड असे एकमेव पुस्तक 24 सप्टेंबर 1982 ला इंग्रजीत Stool Age “चमचा युग” हे पुस्तक लिहिले. ज्याच्या नंतर इतर भाषेत भाषांतर, अनुवाद झाले आहेत.अतिशय परखड,सडेतोड आणि चमचेगिरी, पुणे करार याचे विश्लेषण करून बहुजन समाजाला कसे वागावे याचे मार्गदर्शन यातून होते.
डी एस 4 च्या माध्यमातून सायकल रॅली केली.ज्याद्वारे बहुजन समाजातील लोकांना मोठ्या प्रमाणात जोडले गेले. 

“दो चक्के दो पाव ” :-15 मार्च 1983 ते 24 एप्रिल 1983 सलग 40 दिवस 3200 किलोमीटरचा सायकलरॅली करून सामाजिक क्रांती आंदोलनाला पुढे नेले. हे आंदोलन यशस्वी झाले. 

5.बी एस पी :- वास्तवाचे भान ठेवून योग्य मार्ग अवलंब,योग्य वेळ,योग्य पाऊल निर्णय घेण्यात आणि त्याची काटेकोरपणे अंमल करण्यात  करावा लागेल,याची जाणीव प्रदीर्घ अनुभव, सामाजिक आणि राजकीय अभ्यासातून आली होती.शासनकर्ती जमात बनण्यासाठी राजकारणाची सूत्रे हाती असणे गरजेचे आहे.डी एस 4 च्या माध्यमातून झालेल्या सामाजिक जागृतीला पुर्णपणे कॅश करण्यासाठी  14 एप्रिल1984 ला बहुजन समाज पार्टी या राजकीय पक्षांची स्थापना केली. बाबासाहेबांचे असलेले हत्ती हे चिन्ह मिळविले.याच बरोबर 85% विरुद्ध 15% चा सिध्दांत समजावून सांगितला.त्याचा जनतेतून Result आणला.

*”वोट हमारा ,राज तुम्हारा ।नही चलेगा, नही चलेगा।”*

*”मोहर लगायेगे हाथी पर ,चाहे गोली लगे छातीपर”*

1991च्या लोकसभेच्या 11 जागा मिळविल्या.कांशीरामजी त्यावेळी इटावा येथून निवडुन आले होते.1996 ला ते पंजाब होशियारपूर येथून निवडून आले.2001 साली त्यांनी आपल्या पक्षाची उत्तराधिकारी म्हणून मायावती यांची निवड केली. ज्यांनी उत्तरप्रदेश सारख्या विशाल राज्याची मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली.60 वर्षाचे काम 6 महिन्याच्या मुख्यमंत्री काळात मायावती कडून करून घेतले.लखनौ येथील डॉ आंबेडकरपार्क,बुद्धा युनिव्हर्सिटी, महामाया युनिव्हर्सिटी,छ अनेक जिल्ह्याची नावे ही बहुजन महापुरुषांच्या नावावरून ठेण्यात आली.

साहित्य -वर्तमानपत्रे:- मान्यवर कांशीरामजी यांनी संघटना आणि प्रचार प्रसारासाठी माध्यमाची गरज ओळखली होती.

Untochable India नावाचे इंग्रजी पाक्षिक सुरू केले.याचबरोबर 

“बामसेफ बुलेटिन ” इंग्रजी पत्र सुरू केले.तर ‘बहुजन संघटक’हे हिंदी तर ‘बहुजन नायक’ हे मराठी आणि बांगला भाषेत पत्र सुरू केले.याचबरोबर “बहुजन टाइम्स” आणि 

“बहुजन एकता”हे दैनिक चालू केले.

मान्यवर कांशीरामजी यांना 2003 पासून आजारपणामुळे ते सक्रिय राजकारण यापासून हळूहळू अलिप्त होत गेले. 9 ऑक्टोबर 2006 ला दिल्ली येथे असतांना हार्टअटॅक ने त्यांचे निधन झाले..

 6:प्रेरणादायी संदेश:- तीन लोकांनी स्थापन केले बामसेफ संघटन आज तीन लाख कर्मचाऱ्यांत ,तीन करोड समर्थकात पोहोचले आहे.तीन पिढ्यातील लोक हे काम सद्या सोबत करीत आहेत.

मान्यवर कांशीरामजी यांच्या कृतीविचारांतून बहुजन समाजाला स्वाभिमानी आणि सत्ताधारी बनविले.फुले शाहु आणि आंबेडकर यांच्या कृतीविचारांना पूर्णत्व देणारे ,त्यांना संपूर्ण भारतात घेवून जाणारे बहुजननायक मान्यवर कांशीरामजी होत.

होऊ शकत नाही अशी मानसिकता असणाऱ्या समाजाला त्यांनी “होऊ शकते”! हे दाखवून दिले. सत्तेच्या चाव्या जर असतील तर त्यांनी अनेक सर्वांगीण विकासासाठी बहुजन समाजातील लोकांसाठीच्या योजना प्रभावीपणे अंमलात आणल्या.

गैरराजनैतिक जडे Non political Root मजबूत बनविली.मान्यवर कांशीरामजी यांनी बहुजन समाजाला काही प्रश्न विचारले त्यात——–

 “काय तुम्हाला तुमच्या आई,बहिणी,मुलींची गावागावातून होणारी मानहानी तुमच्या डोळ्यासमोर दिसत नाही का? तुमच्या समाजाचा पदोपदी होणारा अपमान दिसत नाही का? यासाठी तुम्ही काय करत आहात?स्वाभिमान जागृतीसाठी काय श्रम घेत आहात? ही जबाबदारी कोणावर सोपविणार?मंदिरे बांधून,विहार बांधून,जयंती उत्सव,देवाची पूजा करून समस्या आपोआप सुटणार आहेत काय? उत्सवावर होणारा खर्च ,मौज मज्जा,सहल,चैन हा जर दरवर्षी तुम्ही तुमच्या समाजाला स्वाभिमानी बनविण्यासाठी, त्याला स्वतः च्या पायावर उभे करण्यासाठी आणि अन्यायमुक्त करण्यासाठी खर्च करण्याचे ठरविले.तसेच आम्ही सर्वांनी एकजुटीने मिळून हे केले तर आम्ही आमच्या समस्या निश्चित च सोडवू शकतो.”

त्यांचे प्रसिध्द कोट–

“इरादे पक्के हो तो रास्ते मिलते है,नही तो बहाने!”

✒️लेखक :- रामेश्वर तिरमुखे,जालना(09420705653)

(राज्यप्रभारी,सत्यशोधक मूलनिवासी वारकरी महासंघ,महाराष्ट्र)