अत्याचार विरोधी कृती समिती (A.V.K.S.) संलग्नीत “विंचूर ग्रामपालिका सफाई कामगार तर्फे मागण्या सोडविण्याचे निवेदनद्वारे मागणी

27

✒️नाशिक,जिल्हा प्रतिनिधी(शांताराम दुनबळे)

नाशिक(दि.9ऑक्टोबर):-अत्याचार विरोधी कृती समिती (A.V.K.S.)संलग्नीत ” विंचूर ग्रामपालिका सफाई कामगार संघाचे वतीने विविध मागण्यांचे लेखी स्वरूपाचे निवेदन मा. सरपंच साहेब, तसेच मा. ग्रामविकास अधिकारी यांना देण्यात आले.गेल्या अनेक वर्षापासून विंचूर ग्रामपालिकेतील कायमस्वरूपी सफाई कामगारांना कोणत्याही शासकिय सेवासुविधा दिलेल्या नसल्याने; याबाबत वेळोवेळी लेखी, तक्रार, विनंती अर्ज, तसेच प्रत्यक्ष भेट घेऊनही या मागासवर्गीय सफाई कामगारांना न्याय मिळत नाही; हि बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची व अन्यायकारक आहे.

अत्याचार विरोधी कृती समिती संलग्नीत विंचूर ग्रामपालिका सफाई कामगार संघाचे वतीने समितीचे मुख्य निमंत्रक अॅड. राहुल तुपलोढे यांचे नेतृत्वाखाली मा. सरपंच साहेब व मा. ग्रामविकास अधिकारी साहेब यांना लेखी निवेदनाव्दारे विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. यामध्ये खालील प्रमाणे प्रमुख मागण्या केलेल्या आहेत.

१.कायमस्वरूपी कामगारांना नियुक्ती आदेशाची प्रत व ओळखपत्र मिळावे.२.मासिकवेतन पत्रिका मिळावी.३.थकीत प्रोव्हीडंड फंडाची रक्कम खात्यावर जमा करावी.४.किमानवेतन कायद्यान्वये वेतन मिळावे.
५.सेवाजेष्टतेनुसार वेतनवाढ व ईतर पुरक भत्ते मिळावे.६.कामगारांना सेवापुस्तकाची दुय्यम प्रत मिळावी.
७.कामगारांना गणवेश, बुट,रेनकोट,हातमोजे, मास्क स्वच्छतेसाठी साबण, ई वस्तू मिळाली पाहिजे.
८.कामगारांना आरोग्य विषयक सेवासुविधा, आरोग्य विमा, मोफत दवाखाना ई. सुविधा मिळाली पाहिजे. यासह मागण्या केलेल्या आहेत.

सदरच्या मागण्या तात्काळ मंजूर न झाल्यास समितीचे वतीने कामबंद आंदोलनाचा ईशारा देण्यात आलेला आहे.

यावेळी समितीचे मुख्य निमंत्रक अॅड.राहुल तुपलोंढे , विचूर ग्रामपालिका सफाई कामगार संघाचे भाऊसाहेब जाधव (अध्यक्ष), शाम आण्णा कापसे (उपाध्यक्ष), अनिल जगधने (सचिव), दिपक शिरसाठ (कोषाध्यक्ष), काशिनाथ गायकवाड, सिध्दार्थ भोसले, बन्सी शिरसाठ, विजेंद्र निकाळे मंगलाबाई भोसले, छायाताई जाधव, कृष्णाबाई कापसे, संगीताताई गायकवाड, सविताताई ऊबाळे, अर्चनाताई डावरे, सुनंदाताई जगधने आदि पदाधिकारी उपस्थित होते.