वंचित बहुजन युवा आघाडी बिड जिल्ह्याच्या महासचिव, मा. गौरीताई शिंदे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

32

🔹भव्य रक्तदान शिबिर आणि फळवाटप चा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार

✒️नवनाथ आडे(विशेष प्रतिनिधी)

बीड(दि.९ऑक्टोबर):- केज तालुक्यात विविध सामाजिक कार्यात हिरहीरीने भाग घेत असलेल्या व महिलांच्या हक्कासाठी लढा देणाऱ्या गौरीताई शिंदे यांच्या वाढदिवसा निमित्त केज येथील हनुमान मंदिरात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.

या शिबिराला उद्घाटक म्हणून सामाजिक कार्यकर्ते प्रा. हनुमंत भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे, वंचित आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष बबलू साखरे, पोलीस निरीक्षक दादासाहेब सिद्धे, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद यादव, पत्रकार गौतम बचुटे यांच्या उपस्थितीत रक्तदान शिबीराचे उदघाटन झाले.

या प्रसंगी गौरीताई शिंदे यांच्या सामाजिक योगदाना बद्दल त्यांचे कौतुक करून अभिष्टचिंतन केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामिण विकास मंडळ संस्थेचे सलीम शेख, भीमा कांबळे, सैरंद्रा राऊत व सिंधू अदमाने यांनी परिश्रम घेतले.