महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यात धरणा प्रदर्शन आंदोलन

✒️कोल्हापूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

कोल्हापूर(दि.9ऑक्टोबर): -राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ प्रणित प्रोफेसर टीचर अँड नॉन टीचींग एम्प्लॉइज (प्रोटान) संघटन मार्फत महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यात एकाच दिवशी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, अंगणवाडी सेविका, शिक्षण सेवक, विषय तज्,CHB तत्त्वावरिल प्राध्यापक यांच्या विविध समस्यावर एक दिवसीय जिल्हास्तरीय धरणा प्रदर्शन आंदोलन करीत आहे.

शिक्षण क्षेत्रातील विविध मागण्यासाठी त्यांच्या संविधानिक हक्क अधिकारासाठी लढणारे (प्रोटान) हे प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे एकमेव बहुजन कर्मचारी संघटन आहे शासन-प्रशासन आणि न्यायालय अनेक वर्षापासून प्रलंबित असणारे प्रश्न ही संघटना यशस्वीपणे सोडवित आहे.

सरकार एकीकडे कायदा दुरुस्ती करून सुद्धा अनेक कायदेशीर तरतुदी राखून ठेवते आणि दुसरीकडे त्यांच्या अंमलबजावणीसाठी दुर्लक्ष करून कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाचे निवारण करीत एकीकडे कायद्याने बंधनकारक अटींवर शैक्षणिक व प्रशासकीय स्तरावर सरकारचे दुर्लक्ष होऊन अन्यायकारक वागणूक मिळत आहे तर अनिर्देशित न्यायप्रविष्टतेच्या नावाखाली टाळाटाळ करीत आहेत

न्यायालयीन आदेशाच्या अधीन राहून निर्णय घेणे शक्य असतानाही सरकार अनेक प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना न्यायापासून वंचित ठेवत आहे. काही कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष न्यायनिवाडा झाला तरी समय सीमा अनुल्लेखामुळे अन्याय दूर केला जात नाही

म्हणूनच जे सार्वजनिक प्रश्न संघटनेने हाक देऊनही उपरोक्त कारणांनी सरकारला अद्यापही सोडवता आले नाहीत त्यांचा निषेध व्यक्त करुन सरकारला जागे करण्यासाठी प्रोटान दिनांक 21 सप्टेंबर आणि 21 ऑक्टोबर रोजी दोन टप्प्यात राज्यव्यापी आंदोलने करणार आहे. प्राध्यापक,शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतन, नियुक्ती, पदोन्नती, वेतन आयोग, वरिष्ठ व निवड श्रेणी कायम, मान्यता पूर्णवेळ मान्यता, समान वेतन, किमान वेतन, CAS प्रक्रिया अतिरिक्त समायोजन, शाळा महाविद्यालय बंद करण्याचे धोरण, या अनुषंगाने होणारी अडवणूक आणि पिळवणूक याविषयी संघटनेकडून नित्य संघर्ष सुरु आहे. भविष्यात तू आणखी गतिमान, तीव्र आणि उग्र स्वरूपाचा करण्यात येणार आहे

तरी आपण सर्वांनी आपल्या प्राध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व मित्र परिवाराला सोबत या आंदोलनात उपस्थित राहून तन-मन-धनाने सहकार्य करावे असे नम्र आवाहन प्रोटान जिल्हा कार्यकारणी पदाधिकारी यांनी केले आहे.

महाराष्ट्र, मागणी, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED