गोलावाही जंगल परिसरात माझे पर्यटन माझी जबाबदारी उपक्रमातुन स्वच्छता अभियान

22

🔸नेहरू युवा केंद्र व छत्रपती शिवाजी युवा मंडळाचा उपक्रम

✒️भास्कर फरकडे(चामोर्शी प्रतिनिधी)मो:-9404071883

कुनघाडा रै(दि.9ऑक्टोबर):-चामोर्शी तालुक्यातील घोट – चामोर्शी मार्गावरील गोलावाही जंगल परिसरात माझे पर्यटन माझी जबाबदारी या संकल्पनेतून हप्त्यातून एक दिवस व एक तास या उपक्रमातून स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे.सदर उपक्रम नेहरू युवा केंद्र गडचिरोली व छत्रपती शिवाजी युवा मंडळ राजनगटा यांच्या सयुक्त विद्यमाने हाती घेण्यात आला आहे .

चामोर्शी – घोट मार्गावरील गोलावाही हा जंगल परिसर महामार्गाच्या कडेला असून , तुरळक जंगल आहे , परिसरात मातेचे मंदिर असून मंदिरात अनेक देव देवतांच्या मुर्त्या स्थापित केल्या आहेत परिसरालगत घोट, राजनगटा , वालसरा, करकापली, आदी खेडे आहेत येथील मंदिर परिसरात महाप्रसाद , महभोजनाचे कार्यक्रम केले जातात , त्यानंतर परिसरात स्वछता राखली जात नाही , त्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात घान पसरली आहे.

नेहरू युवा केंद्र, गडचिरोली व छत्रपती शिवाजी युवा मंडळ राजनगट्टा या दोन्ही संस्थांनी स्वच्छता मोहीम हाती घेऊन त्या परिसरास पर्यटन स्थळाचा दर्जा मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून या जंगल परिसरात जाऊन स्वच्छता मोहीम राबविली आहे . हे फक्त एक दिवसाचे उपक्रम नसून इथून पुढे हप्त्यातील एक दिवस एक तास या ठिकाणी स्वछता करण्यात येईल अशी माहिती स्वयंसेवी संस्थेने दिली आहे.

शेजारच्या परिसरातील युवक व सामाजीक संस्थानी या उपक्रमात स्वयंम प्रेरणेंनी सहभागी व्हावे असे आवाहन छत्रपती शिवाजी युवा मंडळाचे सचिव अनुप कोहळे यांनी केले. यावेळी नेहरू युवा केंद्र ,गडचिरोली च्या चामोर्शी तालुका समन्वयक कल्याणी गायकवाड, मंडळाचे सचिव अनुप कोहळे, मंडळाचे सदस्य , राजनगट्टा,वालसरा, करकापल्ली येथील युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.