बीड जिल्हा गोरसेना सोशल मिडिया प्रमुख पदी विष्णु राठोड

🔹बीड जिल्हाअध्यक्ष सतीश भाऊ पवार यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान

✒️तलवाडा प्रतिनिधि(शेख आतिख)

तलवाडा(दि.9ऑक्टोबर):-सद्गुरु सेवालाल महाराज यांच्या विचारांचा गजर करून क्रांती सुर्य काशिनाथ नायक यांच्या विचारधारा लक्षात घेऊन गोरसेना बीड जिल्हाध्यक्ष सतीश भाऊ पवार,गोर गावळीया जिल्हाध्यक्ष विजय भाऊ पवार,गोर सिकवाडी तालुका संयोजक राजेंद्र सांगळे साहेब , तालुका सह संयोजक लहु भाऊ चव्हाण, तालुकाध्यक्ष संजय भाऊ राठोड.व गोर सेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

नविन कार्य कारणी पुढीलप्रमाणे, विष्णु राठोड बीड जिल्हा सोशल मिडिया प्रमुख ,विजय राठोड जिल्हा कोषध्यक्ष , गेवराई तालुका उपाध्यक्ष कैलास राठोड, तालुका सचिव बाळराजे राठोड, तालुका सहसचिव किरण राठोड, तालुका सह प्रसिद्धी प्रमुख विकास चव्हाण,चकलांबा सर्कल कोषाध्यक्ष ईश्वर सांगळे,जालींदर चव्हाण बंगाली पिंपळा गण प्रमुख, या सर्व नवनियुक्त पदाधिकारी यांना शासकीय विश्रामगृह गेवराई येथे नियुक्ती पत्र देण्यात आले. तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात आली असून अमरसिंह पंडित यांच्या हस्ते कृष्णाई येथे रहीम यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.

यावेळी बोलतान विष्णु राठोड म्हणाले आमचे नेते सेवालाल महाराज यांचे विचारांचा गजर करणारे क्रांती सुर्य काशीनाथ नायक यांनी टाकलेला विश्वास आपण सार्थ करणार असून कामगार बंधूच्या कल्याणासाठी आपण सतीश भाऊ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार असल्याचे ते म्हणाले.

यावेळी गोर सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED