झोतवाडे गावात भव्य आरोग्य शिबिर संपन्न

✒️विशेष प्रतिनिधी(संजय कोळी)

दोंडाईचा(दि.9ऑक्टोबर):- शिंदखेडा तालुक्यातील झोतवाडे गावात आज ०८-१०-२१ रोजी शुक्रवारी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तसेच बऱ्याच आजारांवर तपासणी करण्यात आली. शिबिर हे लायन्स क्लब ऑफ दोंडाईचा यांच्या सयुक्त विद्यमाने सहकार्याने डॉ. मंडाले यांना झोतवाडे येथे भव्य आरोग्य शिबिर साठी अमत्रित केले होते. यात MD डॉक्टर याच्याकडून बी.पी. डायबिटीज, दमा व इतर आजारांवर नि.शुल्क शिबिरात तपासणी करण्यात आली. शिबीर हे झोतवाडे गावातील महर्षी वाल्मिकी मंदीर येथे सकाळी 8 वाजता शिबिराचे आयोजीत केले होते.

तसेच सामाजिक कार्यकर्ते सुरेश कुवर सर यांच्या नेतृत्वाखाली झोटवाडे गावात आरोग्य शिबीरात आयोजीत करण्यात आले होते.तसेच शिबिराला ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. तसेच यावेळी कोरोना काळात कोरोना योध्दा सेवा बजावनाऱ्या म्हणून सत्कार मुर्ती त्यात नितीन पाटील, जितेंद्र चव्हाण , आशा वर्कर भारती सदाराव ,रणजीत ठाकरे, बाळकृष्ण साळुंखे, यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी वृक्ष लागवड करण्यात आली. तसेच 100 गरजु विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आली.

तसेच नवरात्री चे औचित्य साधून महिला न साठी फराळ वाटप करण्यात आली. व मोठ्या उत्साहाने व नागरिकांच्या उपस्थितीने आरोग्य शिबिर हे संपन्न झाले. यावेळी ग्रामपंचायत सरपंच शोभाबाई सुनील ठाकरे,तसेच सर्व सदस्य व नवनिर्वाचित प.स. सदस्य वंदना भारत ईशी होते.कार्यक्रम चे आयोजन सुरेश कुवर सर,रणजीत ठाकरे,सतिश चौहान,मयूर सदाराव,बाळकृष्ण साळुंखे,विनोद ठाकरे,यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED