प्रहार दिव्यांग संघटनेच्या नांदेड जिल्हाध्यक्ष पदी श्रीराम पा.पवार यांची निवड

✒️चांदू आंबटवाड(नायगाव ता.प्रतिनिधी)मो:-9307896949

नांदेड(दि.9आँक्टोंबर):-रोजी नांदेड येथील प्रहार दिव्यांग साह्यता केंद्रात पार पडलेल्या एका कार्यक्रमात प्रहारचे संस्थापक व महाराष्ट्र राज्य मंत्री ना.भच्चूभाऊ कडू यांचे विचार दिव्यांग, विधवा, निराधार व शेतकरी यांच्या पर्यंत पोहचवण्याची जबाबदारी नांदेड जिल्हा प्रमुख विठ्ठलराव मंगनाळे यांनी बोलावलेल्या विषेश बैठकीत नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्ष पद श्रीराम गोविंदराव पा.पवार आलूवडगावकर यांच्यावर सोपवण्यात आली.

त्यांची दिव्यांग, विधवा, निराधारां प्रती कार्य करण्याची जिद्द व तळमळ लक्षात घेऊन नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्ष पदाची धूरा त्यांच्या खांद्यावर देण्यात आली व नवनिर्वाचित अध्यक्षांनी सुद्धा मा.जिल्हा प्रमुखांनी दिलेली जबाबदारी मी सक्षम पणे सांभाळून, दिव्यांगांची सेवा करण्याचे नमूद केले.

त्यांना शुभेच्छा देण्यासाठी विठ्ठलराव मंगनाळे, विठ्ठलराव देशमुख, गणेश पा.हंडे, पंढरीनाथ हुंडेकर, मारोती मंगरूळे, राजू ईबितवार, चांदू आंबटवाड, मिलिंद कागडे, बाळासाहेब डाकोरे,साईनाथ बोईनवाड,हानमंत सिताफुले,संगिता बामने,शांताबाई चिंतले, राजु ईरेवाड,सिद्धार्थ जमदाडे, साहेबराव निवडंगे,बालाजी मुगावे,रेष्मा मामीडवार सह लोहा-कंधार येथील शेकडो दिव्यांग बांधव हजर होते.

श्रीराम पा. पवार आलुवडगावकर यांच्या वर आज जिल्हाभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आहेत..

 

नांदेड, महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED