विनायक विज्ञान महाविद्यालयामध्ये गांधी जयंती निमित्य प्लॉगिंग रनचे आयोजन

29

✒️प्रदिप रघुते(विशेष प्रतिनिधी येनस)

येनस(दि.9ऑक्टोबर):– प्रविण खोडके मेमोरियल ट्रस्ट द्वारा संचालित विनायक विज्ञान महाविद्यालय नांदगाव खंडेश्वर येथील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व नगरपरिषद नांदगाव खंडेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने गांधी जयंती निमित्त 2 ऑक्टोबर 2019 रोजी प्लॉगिंग रन (चालता चालता कचरा गोळा करणे ) चे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान श्री लाल बहादुर शास्त्री यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली.

याप्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अल्का अनंत भिसे व मीनाक्षी यादव मुख्य अधिकारी नगर परिषद नांदगाव खंडेश्वर त्यांचे सहकारी डॉ. सुचिता खोडके व वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख राष्ट्रीय सेवा योजना विभाग मुख्य कार्यक्रम अधिकारी श्री निशांत जयस्वाल तसेच डॉ. कविता काकडे महिला कार्यक्रम अधिकारी महाविद्यालयाचे प्राध्यापक वृंद ,शिक्षकेत्तर कर्मचारी नगर परिषदेचे सफाई कामगार व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक , नांदगाववासी आठवडी बाजारातील दुकानदार उपस्थित होते. या प्रसंगी रा से यो स्वयंसेवकांद्वारा स्वच्छतेचे महत्व पटवून देणारे पथनाट्य सादर करण्यात आले.
या पथनाट्य द्वारे ग्राम स्वच्छता बद्दल जनजागृती करण्यात आली. आपल्या घरच्या कचऱ्याचे वर्गीकरण ओला कचरा आणि सुका कचरा मध्ये करणे आणि घंटा गाडीमध्ये टाकणे. प्लास्टिक चा वापर न करणे तसेच रस्त्यावर कचरा न टाकणे गणपती उत्सवामध्ये मातीच्या मूर्तीला प्राधान्य देण्यात यावे तसेच गणपती विसर्जन घरीच करावे आणि निर्माल्या पासून कंपोस्ट खत तयार करावे हे पथनाट्याद्वारे सांगण्यात आले.

प्लॉगिंग रन मध्ये भाग घेत महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी रस्त्याने पडलेल्या प्लास्टिक व इतर कचरा गोळा करून घंटा गाडीमध्ये टाकला. ग्राम स्वच्छता केली यामध्ये महाविद्यालयाच्या प्राचार्य माननीय डॉ. अलका भिसे यांनी सुद्धा सहभाग घेतला तसेच मीनाक्षी यादव मुख्य कार्यकारी अधिकारी नगर परिषद नांदगाव खंडेश्वर मॅडम यांनी या प्रसंगी महाविद्यालयाची प्रशंसा केली. यांनी सर्वांना उद्देशून सांगितले की स्वच्छतेची सुरुवात ही स्वतः पासून करायला हवी तसेच भविष्यात असेच पर्यावरण पूरक कार्यक्रम राबवावे असे सांगितले.