युवाशक्ती ग्रामविकास संघटनेची परभणी जिल्ह्याची कार्यकारणी जाहीर

🔸जिल्हाध्यक्षपदी परमेश्वर ढोणे तर उपाध्यक्षपदी बाळासाहेब जंगले

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.9ऑक्टोबर):-ग्रामीण भागाच्या परिपूर्ण विकासासाठी ग्रामपंचायतीचा कारभार कशा प्रमाणे चालतो याची माहीती, केंद्राच्या आणि राज्याच्या शासनाच्या विविध योजनेची माहिती, माहिती अधिकार संदर्भात माहिती मिळवणे,ग्रामीण भागातील नागरिकांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी युवाशक्ती ग्रामविकास संघटनेची स्थापना करण्यात आली आहे.

दिनांक 29 सप्टेंबर रोजी संस्थापक अध्यक्ष इम्रान पठाण सचिव डॉ.पुरुषोत्तम सदार यांच्या मार्गदर्शनाखाली ऑनलाईन मुलाखत घेवुन युवाशक्ती ग्रामविकास संघटनेची परभणी जिल्ह्याची कार्यकारणी जाहीर करण्यात आली.
युवाशक्ती ग्रामविकास संगघटन परभणी जिल्ह्याची कार्यकारणी
श्री परमेश्वर द्वारकादास ढोणे – अध्यक्ष
श्री देवराव (बाळासाहेब) नारायणराव जंगले – उपाध्यक्ष
श्री आकाश रंगनाथ वावळे – सचिव*श्री विजय शिवाजीराव डोंबे – कोषाध्यक्ष
श्री गोविंद भगवान साबळे – सहसचिव
श्री संभाजी एकनाथ डाखोरे – सहकोषाध्यक्ष
दामाजी ज्ञानोबा घोगरे – जिल्हा जनजागृती अभियान प्रमुख
श्री अंकुश रामभाऊ करके,सोशल मिडिया प्रसिद्धी प्रमुख
श्री मंचक विक्रम इंगोले प्रिंट मिडिया प्रसिद्धी प्रमुख
श्री बळवंत माणिकराव मोगरे नियोजन जिल्हा प्रमुख यांची निवड करण्यात आली.नवनिर्वाचीत अध्यक्ष सचिव,उपध्यक्ष व सदस्य यांचे स्वागत करुन शुभेच्छा देण्यात आल्या.

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED