नगरसेवक पंढरीनाथ दाचावार यांच्या वाढदिवसा निमीत गो-शाळेस देणगी…

27

✒️अशोक हाके(बिलोली,ता.प्र.)मो:-9970631332

बिलोली(दि.9ऑक्टोबर):- तालुक्यातील कुंडलवाडी
येथील जेष्ठ नागरीक व प्रतिष्ठीत व्यापारी तथा विद्यमान नगरसेवक पंढरीनाथ दाचावार यांच्या वाढदिवसानिमीत्त गो-शाळेस पाच हजार शंभर रूपये देणगी दिले.
पंढरीनाथ दाचावार यांनी ८० वे वर्ष संपऊन ८१ व्या वर्षात पदार्पण केले असुन दि.९ अॉक्टोंबर रोजी त्यांच्या निवासस्थानी कार्यक्रम घेण्यात आला असुन या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नपाचे माजी उपाध्यक्ष डॉ.विठ्ठलराव कुडमूलवार हे होते.

तर प्रमुख पाहूणे म्हणुन बाजार समितीचे माजी सभापती बाबाराव पा.भाले,सेवानिवृत प्रा.जयप्रकाश कमटलवार,एन.जी.वाघमोडे हे होते.दाचावार यांनी आपले वाढदिवसाचे औचित्य साधून गो-शाळेस देणगी देऊन एक सामाजिक बांधिलकी जोपाली असुन यावेळी डॉ.विठ्ठलराव कुडमूलवार,बाबाराव पाटील भाले,एन.जी.वाघमोडे,कल्याण गायकवाड,चटलुरे सर आदींनी मनोगतातुन शुभेच्छा दिल्या.यावेळी दिनेश दाचावार,राजू लापशेटवार,अशोक हाके,लक्ष्मण भंडारे,संतोष चव्हाण,आदी उपस्थित होते.
सुत्रसंचालन व आभार डॉ.प्रा.माधव हळदेकर यांनी केले.