येवला तालुक्यात चक्रीवादळाचा झटका- कापणी आलेले पिकाचे नुकसान

✒️संदिप सोनवणे(विशेष प्रतिनिधी येवला)मो:-९६०४१६२७४०

येवला(दि.9ऑक्टोबर): – आज चक्रीवादळाचा चांगला झटका येवला तालुक्यात बसला आहे कापणी आलेले पिक पाऊसा मुळे कापणी होत नाही त्यत चक्रीवादळाचा जोरदार पाऊस झाल्याने शेतकरी नाराजी व्यक्त करत आहे.

त्यत साताळी येथे जोरदार पाऊस झाल्याने बबन सोनवणे यांच्या शेतीमध्ये आडकलेले बाजरी सोंगणार मजुर नदीला आलेल्या पुरातून काढताना ग्रामपंचायत सदस्य अमोल सोनवणे, राहूल कोकाटे, दिलीप काळे, सचिन कोकाटे, राजेंद्र कोकाटे, सोमनाथ सोनवणे, अनिल कोकाटे,बापू राजगुरू, विशाल काळे, आदि शेतकऱ्यांच्या सहकार्याने त्यांना सुखरुप नदीच्या बाहेर काढण्यात आले

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED