लाळ लसीकरण काळाची गरज, लसीकरणाचे गैरसमज दूर करावेत डॉ निलेश शिंदे

25

✒️खटाव प्रतिनिधी(नितीन राजे)

खटाव(ता.10ऑक्टोबर):- .खटाव येथील शेतकरी व पशुपालन करणार्‍या शेतकर्‍यांनी व युवक दूध व्यवसाय उद्योजकांनी पाळीव जनावरे यांना लाळ लसीकरण मोहिमेत सहभागी होऊन लसीकरणाचे गैरसमज दूर करावीत आवाहन खटाव येथील पशुधन विकास अधिकारी वर्ग १ डॉ.निलेश शिंदे यांनी आवाहन केले आहे.ग्रामीण भागामध्ये शेतकरी वर्ग खूप मेहनतीने शेती करतो तर आत्ताचे युवापिढी दूध व्यवसाय करण्यासाठी दूध देणाऱ्या गाई म्हशी यांचे पालन करत आहे या पशुचे लाळ रोगापासून लाखो रुपये किमतीच्या जनावरांचे संरक्षण करण्यासाटी लसीकरण हा उपाय आहे .

भारत देशात लाळ खुरकुत लसीकरण रोग मुक्त करायचे आहे या पशुधनाकडून रोजच्या आहारातील दूध व दूध उत्पादने माणसाला हे सहज उपलब्ध होते या पशुधनासाठी आपण सर्व शेतकरी बांधव लसीकरण मोहिमेत सहभाग घेऊया या विषाणूजन्य आजारामुळे पशुधनाचे व पर्यायाने पशु मालकाचे मोठी आर्थिक नुकसान होते हा आजार म्हणजे पशुधनाला लागलेली कीड आहे या आजारात वेळेतच लसीकरण करणे अतिशय महत्त्वाचे आहे राष्ट्रीय रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत केंद्र पुरस्कृत लाळ खुरकुत लस उपलब्ध होते ही लस वर्षातून दोनदा आहे ऑक्टोंबर नोव्हेंबर व मार्च एप्रिल दुसरा डोस दिला जातो हा विषाणूजन्य आजार असल्याने डायरेक्ट असा उपाय नाही यावर एकच उपाय हा रोग कोणत्या जनावराला होऊ नये कीड टाळणे म्हणजे उपचारा ऐवजी लसीकरण हाच एक उपाय शिल्लक आहे पशुसंवर्धन विभागाने यापूर्वी रिडरपेस्ट या आजाराने निर्मूलन केले आहे केंद्र सरकारने लाळ प्रतिबंधक लस हा फ्लॉगशिप प्रोग्राम आहे.

या कार्यक्रम अंतर्गत जनावरांना कानाला बिल्ले लावले जातात त्यातून सर्व माहिती दवाखान्यात ठेवले जाते अशा जनावरांना येणाऱ्या तापामुळे जनावरे अशक्त होतात काही जनावरे लंगडी होतात वेळेतच उपचार न केल्यास जनावरे दगू देखील शकतात
पशुपालक शेतकऱ्यांचा गैरसमज लस दिल्यानंतर जनावरांचे दूध घटते जनावरांना एक ते दोन दिवस कणकणी येते त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात ही गोष्ट घडते याकडे दुर्लक्ष करून लस टोचणे गरजेचे आहे.शेतीमध्ये काम करणाऱ्या बैलांना ही लस टोचल्यानंतर तीन ते चार दिवस ओढकामाला विश्रांती देणे गरजेचे आहे म्हणजे शेतीमधील कुठले काम करू नये हि लस घेतली नाही तर बैलांना शेतीतील कामे करण्याची क्षमता या रोगामुळे कायमची कमी होते गाभण जनावरे यांना ही लस कोणत्याही महिन्यात देण्यात येते खोल स्नायूंमध्ये दिल्यास कोणताही अपाय होत नाही लस न दिल्यास गाभण जनावर आपल्या पोटातील पिला सहित मरू शकते तरी या जनावरांना लस देणे गरजेचे आहे.

या आजाराची सर्व साधारण लक्षणे व प्रसार कसा असतो या रोगाचा प्रसार संसर्गजन्य असल्याने रोगी जनावरांकडून लाळ ,मलमूत्र व रोगी पशुधनाच्या संपर्कात असलेल्या माणसाकडून होतो, जनावरांना ताप येणे व काम क्षमता कमी होणे दूध उत्पादन घटने ,जनावरांमध्ये वांझ राहण्याची शक्यता वाढते तसेच कत्तल केल्या जाणाऱ्या जनावरांचे मांस प्रगत देशात न घेतल्याने त्या मासांची किंमत कमी झाल्याने देशाचा व पर्यायाने पशुपालकांचा तोटा होतो तसेच जनावरांच्या पायाच्या नक्की मध्ये फोड येणे ,तोंडाला जिभेवर गालाला व ओठाच्या आतील बाजूला जखमा होणे ,लहान वासरे यामध्ये गाई ,म्हैस वर्गातील लहान वासरे पाच ते सहा महिन्या वरील वासरांना ही लस अवश्य द्यावी आमच्या जनावरांना यापूर्वी कधी आजार झाला नाही आणि यापुढे कधी होणार नाही असा फाजील आत्मविश्वास व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांनी बाळगू नये व जनावरांना लसीकरण करून घ्यावे व लाळ खुरकुत लसीकणास पशुपालकांनी सहभागी होण्याचे आवाहन व एकच नारा लाळया खुरकुत टाळा ,, व रोगांपासून भारत देश समृद्ध करा असे खटाव येथील पशुधन विकास अधिकारी डॉ निलेश शिंदे यांनी पाळीव जनावरे असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना आपापल्या गावातील पशु वैद्यकीय दवाखान्याची संपर्क करा असे ते म्हणाले आहेत.