चंद्रलाल घोरमोडे वर अदखलपात्र गुन्ह्याची नोंद

✒️देसाईगंज,वडसा(पुरोगामी संदेश नेटवर्क)

देसाईगंज(वडसा)(दि.10ऑक्टोबर):- पोलीस पाटील यांना दारू पकडत नाही, असे म्हणून शिवीगाळ करणाऱ्या चंद्रलाल घोरमोडे वर पोलीस पाटील यांच्या तक्रारीवरून देसाईगंज पोलीस स्टेशन येथे अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.सविस्तर वृत्त असे की, देसाईगंज तालुक्यातील गांधीनगर येथील पोलीस पाटील श्री प्रेमदास चहांदे हे सायंकाळच्या सुमारास गावातील शिवाजी पुतळ्या जवळून जात असताना, दारूच्या नशेत असलेला चंद्रलाल हनुमान घोरमोडे (वय २४) याने त्यांना थांबवून तू गावातील दारू पकडत नाही, तू पोलीस पाटील पदाचा राजीनामा दे, अशा प्रकारच्या अर्वाच्छ भाषेत चौकात शिवीगाळ केली.

याबाबतची तक्रार पो.पा. प्रेमदास चहांदे यांनी लगेच दि. ०६/१०/२०२१ ला पोलीस स्टेशन देसाईगंज येथे दिली. यावरून देसाईगंज पोलिसांनी चंद्रलाल घोरमोडे वर भादंवी कलम ५०४ अन्वये अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली. तर पोलीस पाटील असून सुद्धा माझ्यावर अदखलपात्र व्यक्तीरिक्त कोणतीच कलम किंवा कारवाई न करण्यात आल्याने घोरमोडे च्या मुजोरीत वाढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे. सदर युवक गावात वादग्रस्त असून नेहमीच दारूच्या नशेत नागरिकांना व कुटुंबियाना शिवीगाळ करीत असतो. त्यामुळे गावातील वातावरण खराब होऊन गावात याचे विपरीत परिणाम दिसून येत आहे. अशा मुजोर व दारुड्या युवकाला पोलिसांनी अद्दल घडवावी. अशी मागणी जोर धरू लागली आहे.

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED