शिक्षकांचे प्रश्न प्रामाणिक पणे सोडविणार :राम देवसरकर उमरखेड तालुक्यातील उत्कृष्ट शिक्षकांचा सत्कार ,कौतुकाची थाप

28

✒️अमोल उत्तम जोगदंडे(विशेष प्रतिनिधी)

उमरखेड(दि.10ऑक्टोबर):-जिल्ह्यातील शिक्षकांचे सर्व प्रश्न समस्या सोडविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याची ग्वाही जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती राम देवसरकर यांनी दिली. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटना कास्ट्राइब शिक्षक संघटना व महाराष्ट्र राज्य शिक्षक भारती संघटनेच्या वतीने आयोजित शिक्षक सत्कार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य चितांगराव कदम, देविदास खोकले, प्रवीण कुमार वानखेडे, ज्ञानेश्वर नाकाडे ,गजानन देऊळकर, संदीप मोहोड,संजय राऊत, राजू पाटील ,अवधूत वाघमारे ,दीपक राणे, राजमहेंद्र वानखेडे, शिवाजीराव वानखेडे, प्रकाश देवसरकर, अशोक शिंदे, पत्रकार अविनाश खंदारे, साहेबराव धात्रक, बाळासाहेब ओझलवार उपस्थित होते.
यावेळी सेवानिवृत्त शिक्षक गुणवंत शिक्षक आणि शिक्षकांचे पाल हे उपस्थित होते.

जिजाऊ सांस्कृतिक भवनातील या कार्यक्रमात प्राथमिक शिक्षकांचा सेवापुर्ती सोहळा व दिवंगत जगदेवराव पाटील राणे गुरूगौरव पुरस्कार सोहळा पार पडला गुणवंत शिक्षकांना ही सत्कार करून प्रोत्साहित करण्यात आले .यावेळी विश्वनाथ पांडे, पांडुरंग पवार, संभाजी कुंबलवाड , शालिक हेडाऊ, प्रकाश शिंदे ,प्रकाश जाधव ,गणेश कदम, बेबी गायकवाड, रामराव माने ,अशोक भोसले ,बाबाराव ईटकर ,व्यंकटी पॉपुललवाड ,सतीश घोडके, राजू पहुकर ,गजानन माने ,धनराज पाचपुते ,साकिब आमिर नकिब खान, रत्नमाला कावळे, योगीता तुमराम आदींचा सन्मान करण्यात आला.