आमदार देवेंद्र भुयार यांच्या पुढाकाराने अमोल गवई यांची मुंबई येथे मोफत शस्त्रक्रिया !

🔹२ लक्ष रुपयांची मोफत शस्त्रक्रिया ; गवई कुटुंबाला मिळाला दिलासा !

✒️वरुड(पुरोगामी संदेश नेटवर्क)

वरुड(दि.10ऑक्टोबर):-आमदार देवेंद्र भुयात मोर्शी विधानसभा मतदार संघामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम राबवताना दिसून येतात. त्यांनी आत्तापर्यंत शिक्षण, आरोग्य, महिलांचे प्रश्न अशा विविध प्रश्नांवर त्यांनी चांगले काम केलं आहे. ते सातत्याने नाविन्यपूर्ण काम करण्यात अग्रेसर असतात. असेच त्यांच्याकडे आरोग्याचा विषय घेऊन जाणाऱ्या व्यक्तीला त्यांनी सहकार्य केले आहे.
आमदार देवेंद्र भुयार वरुड मोर्शी तालुक्यातील रुग्णांचा ईलाज करण्यासाठी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी रुग्णसेवा देण्यासाठी नेहमी तत्पर असतात, आमदार देवेंद्र भुयार यांनी ज्या गरिबांजवळ असाध्य रोगांवर उपचार करवून घेण्यासाठी पैसा नाही, ज्यांना मरणाशिवाय पर्याय नाही अशा रुग्णांना मदत करत आहे. त्यांनी आदिवासी व ग्रामीण भागांत राहणार्‍या गरीब व कोणीही वाली नसलेल्या रुग्णांना स्वास्थ्य सुविधा पुरवविण्याचे काम करीत आहे.

वरुड येथील अमोल विलास गवई वय ३१ वर्ष या युवकांच्या तब्बेतीची माहिती मिळताच आमदार देवेंद्र भुयार यांच्या पुढाकाराने नूर हॉस्पिटल मोहमद अली रोड मुंबई येथे अमोल विलास गवई यांना दाखल करण्यात आले असून अमोल विलास गवई यांचे हिप रिप्लेसमेंट कमरेचे बॉल चे जवळपास 2 लक्ष रुपयांचे मोफत ऑपरेशन नूर हॉस्पिटल मोहमद अली रोड मुंबई येथे करण्यात आले असून त्यांची हिप रिप्लेसमेंट ची शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली.

अमोल विलास गवई या युवकाचे आमदार देवेंद्र भुयार यांच्या पुढाकाराने मुंबई येथे हिप रिप्लेसमेंटची शस्त्रक्रिया तात्काळ व मोफत करण्यात आली.आमदार देवेंद्र भुयार यांच्या पुढाकाराने व सहकार्याने अमोल विलास गवई या युवकाचे चे जीवन सुकर झाल्याने परिसरातील नागरिकांनी आमदार देवेंद्र भुयार यांचे आभार व्यक्त केले.

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED