महाविकास आघाडीच्या वतीने दिनांक 11 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंद चे आवाहन

25

🔸बंद यशस्वी करण्याचे सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष संजय हेमगड्डी यांचे नागरिकांना आवाहन

✒️जगदीश का.काशिकर(विशेष प्रतिनिधी)मो:-९७६८४२५७५७

साेलापुर(दि.10ऑक्टोबर):- लखीमपूर खिरी शेतकरी हत्याकांड, कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांच्या अटकेच्या व शेतकरी आंदोलन आणि न्याय हक्कांसाठी लढणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंद चे आवाहन केले आहे त्याविषयी सोलापूर शहर कॉंग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांची महत्वाची बैठक शहर कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी यांच्या अध्यक्षतेखाली आज रोजी कॉंग्रेस भवन येथे संपन्न झाली.

यावेळी बोलताना शहर कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी म्हणाले की, उत्तर प्रदेशातील लखिमपुर खिरी येथील आपल्या न्याय हक्कांसाठी शांततेने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंगावर भाजपच्या सरकारकडून चिरडून टाकल्याच्या घटनेचा संपूर्ण देशभरात सर्व स्तरातून तीव्र निषेध करण्यात येत आहे. देशातील शेतकऱ्यांवर भाजपचा केंद्र सरकारकडून व भाजपशासित राज्य सरकारकडून सातत्याने अन्याय अत्याचार होत आहेत भाजप सरकारचे हे कृत्य हिटलर व मुसोलिनी यांनाही लाजवेल अश्या प्रकारचे असून लखिमपुर खिरी येथे शेतकऱ्यांना सामूहिक रित्या ठार मारण्याची घटना जनरल डायर ने केलेल्या हत्याकांडाची आठवण करून देणारे आहे.

या प्रकरणाच्या विरोधात आवाज उठवणारे काँग्रेसचे नेते आदरणीय प्रियंका गांधी यांना तुरुंगात डांबून इंग्रज राजवटीचा परिचय भाजप सरकारने करून दिला आहे. व इतर नेत्यांना ही अटक केली अश्या या क्रूर अत्याचारी भाजप सरकार विरोधात संपूर्ण देशभर आंदोलने सुरू आहेत. भाजपच्या केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालून लखीमपुर खिरी येथे शेतकऱ्यांना ठार मारणाऱ्या घटनेचा निषेध करण्यासाठी शेतकऱ्यांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी राज्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व मित्र पक्षाच्या महाविकास आघाडीने सोमवार दिनांक 11 ऑक्टोंबर 2019 रोजी महाराष्ट्र बंदचे आवाहन केले आहे.

तरी सोलापूर शहर व जिल्ह्यातील नागरिक बंधू-भगिनींनी कोरोना साथ रोगाचे नियम पाळून आपला व्यवसाय बंद ठेवून या महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी होऊन शेतकऱ्यावरील अत्याचारी जुलमी घटनेचा निषेध करावा या महाराष्ट्र बंद आंदोलनात काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना व मित्र पक्षाच्या महा विकास आघाडीतील सर्व जिल्हा कमिटीच्या आघाडी संघटना विविध फ्रंटल सेल व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घेऊन महाराष्ट्र बंद यशस्वी करावा. या महाराष्ट्र बंद मध्ये अत्यावश्यक सेवा वगळण्यात आलेल्या आहेत असे आवाहन सोलापूर शहर कॉंग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी यांनी केली आहे.

यावेळी नगरसेवक शिवा बाटलीवाला, हाजी तौफीक हत्तुरे, स्थापत्य समिती सभापती अनुराधा काटकर, महिला अध्यक्ष हेमाताई चिंचोळकर, ब्लॉक अध्यक्ष देवाभाऊ गायकवाड, बाबुराव म्हेत्रे, भटक्या विमुक्त अध्यक्ष भारत जाधव, युवक अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे, सेवादल अध्यक्ष भिमाशंकर टेकाळे, माजी सभापती देवेंद्र भंडारे, शहर उत्तर समन्वयक सुनील रसाळे, प्रदेश सरचिटणीस किसन मेकाले गुरुजी, माजी महापौर आरिफ शेख, नरसिंह आसादे,भटक्या विमुक्त युवक अध्यक्ष पवन गायकवाड, अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष उमेश सुरते, उद्योग सेलचे पशुपती माशाळ, अंबादास गुत्तीकोंडा, नागनाथ कदम, N. K. क्षीरसागर, हसीब नदाफ, राजन कामत, बसवराज म्हेत्रे, युवराज जाधव, सिद्राम अट्टेलुर, अशोक कलशेट्टी, हारून शेख, दत्तोबा बंदपट्टे, रमेश कैरमकोंडा, जाबिर अल्लोळी, अनिल मस्के, रामसिंग आंबेवाले, सुमन जाधव, संध्याताई काळे, नुराहमद नालवाल, रमेश फुले, राहूल बोलकोटे, सुरेश तोडकरी, सायमन गट्टू, दिनेश म्हेत्रे, गणेश साळुंखे, परशुराम सतारेवाले, सूर्यकांत शेरखाने, सुनील व्हटकर, उपेंद्र ठाकर, सिद्धाराम आनंदकर, भोजराज पवार, संजय गायकवाड, अप्पसाहेब बगले, रजाक कादरी, चक्रपाणी गज्जम, यल्लप्पा तुपदोलकर, नागनाथ कासलोलकर, श्रीधर काटकर, निलेश व्हटकर, अमृतदत्त चिन्नी, VD गायकवाड, अंबादास जाधव, अनिल वाघमारे, प्रमिला तुपलवंडे, प्रियांका डोंगरे, इलियास शेख, रवींद्र शिंदे, गोविंद कांबळे, सलीम मनुरे, अनुपम शहा, वी पी सिंग, सॅमसन दिनकर, शक्ती कटकधोंड, जाकीर मणियार, अंबादास नाटेकर, राजेश झांपले, प्रतीक आबुटे, भोजराज पवार, बाबू विटे, महेशकुमार मस्के, शिवाजी साळुंखे, मल्लिनाथ सोलापुरे, श्रद्धा हुल्लेनवरू, लखन गायकवाड, शोहेब कडेचुर, मुमताज तांबोळी, अनिता भालेराव, शोभा बोबे, राजू क्षीरसागर, प्रशांत सोनवणे, रमाकांत साळुंखे, धैर्यशील बाबरे, दत्ता नामकर, नागनाथ बंगाळे, गणेश बुवा पंडित, किरण राठोड, ज्ञानेश्वर जाधव, आयुब शेख, सुभाष वाघमारे, धीरज खंदारे, पूजा नुल्लूरवार, मुशताक वलसंगकर, शकुर शेख, श्रीनिवास परकीपंडला, श्रीकांत दासरी, सोपान थोरात, शशिकांत जाधव, बसंती साळुंखे, मीना गायकवाड, चंदाताई काळे, आयुब जमादार, करीम शेख यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.