धम्म-संविधान हायकू या डिजिटल हायकू संग्रह करता हायकू काव्य रचनाकारांना आवाहन

36

✒️संदिप सोनवणे(विशेष प्रतिनिधी,येवला)मो:-९६०४१६२७४०

येवला(दि.10ऑक्टोबर):-डिजिटल गझल-गुंफा ग्रंथाचहा अभूतपूर्व यशानंतर महाराष्ट्रातील नामवंत हायकूकारांचा (हायकू काव्य) संपादित डिजिटल धम्म-संविधान हायकू
संग्रह येथील दीक्षा-प्रशिल प्रकाशन प्रकाशित करीत असून मानवतावादी विचार तथा धम्म व भारतीय संविधानिक मूल्य (समता, स्वातंत्र्य, न्याय,बंधुता,धर्मनिरपेक्षता, वैज्ञानिक दृष्टीकोन, राष्ट्रवाद,राष्ट्रीय एकता- एकात्मता, अंधश्रद्धा निर्मुलन, सामाजिक प्रबोधन, शिक्षण,आरोग्य, या व संविधानिक तत्व- विचार- प्रचार- प्रसार-अंगीकार) या विषयावरील दर्जेदार पाच ते सात हायकू काव्य रचना दिनांक २५ ऑक्टोबर २०२१ पर्यंत संपादक शरद विमल दिनकर शेजवळ यांस ९८२२६४५७०६ ह्या व्हाट्सआप व sharadshejwal@gmail.com या मेल आयडी वर पाठवण्याचे आवाहन दीक्षा-प्रशिल प्रकाशन ,नाशिक यांच्या वतीने करण्यात येत आहे.
आपल्या संपर्कातील हायकू काव्य कारांचे संपर्क नंबर जरूर कळवा असे आवाहन करण्यात आले आहे.