उत्तर प्रदेशातील लखीमपुर खिरी घटनेच्या निषेधार्थ तालुका धानोरा महाविकास तर्फे हुकूमशाही भाजपा सरकारचा निषेध व्यक्त केला.!

33

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

गडचिरोली(दि.11ऑक्टोबर):-उत्तर प्रदेश राज्यातील लखीमपुर खिरी येथे आंदोलक शेतकऱ्यांना चिरडणाऱ्या भाजपा सरकारच्या केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याने शेतकऱ्यांचा अंगावर वाहन नेऊन शेतकऱ्याना चिरडले. यात चार शेतकरी व एक पत्रकार ठार झाले. यात अनेक शेतकरी जखमी झाले. या घटनेचा व भाजपा सरकारच्या हुकूमशाही प्रवृत्तीच्या निषेधार्थ तालुका धानोरा महाविकास आघाडी च्या वतीने निषेध व्यक्त केले. धानोरा तालुका बाजारपेठ बंदला महा विकास आघाडी तालुका धानोरा तर्फे प्रतिसाद देत केंद्रातील भाजप सरकारचा जाहीर निषेध व्यक्त करुन, केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांनी राजीनामा द्यावा अशी घोषणबाजी करण्यात आले.

त्याच प्रमाणे शेतकऱ्यांना चिरडणाऱ्या केंद्रीय गृहराज्यमंत्री मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याला फाशी देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली.

या घटनेचा निषेधार्थ उपाध्यक्ष जिप तथा काँग्रेस तालुका अध्यक्ष मनोहर पोरेटी, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष सोपानदेव म्हशाखेत्री, शिवसेना तालुका अध्यक्ष, शेखर उईके, विनोद लेनगुरे जि.प सदस्य, मुकुल बोडगेवार युवा सेना, राजु भाऊ मोहूर्ले, जमीर भाई कुरेशी महासचिव युवक काँग्रेस, महेश भाऊ चिमुरकर, घनश्याम जी राऊत, अजीज भाई कुरेशी, सुखदेवजी टेकाम, संजय गावडे , भुषण भैसारे अध्यक्ष अनु जाती, पुरुषोत्तम चिंचोलकर, आनंदराव जी थोरात, किसन चंदेल, पंकज उंदिरवाडे, वकील पठान, कुणाल लेनगुरे, श्रेयस मेश्राम, आश्विन सोरते, अनिरुद्ध कुळमेथे, गोपी गुरनुले तसेच महाविकास आघाडी तालुका धानोरा चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.