दिव्यांग क्रिकेट स्पर्धेचा समारोप

52

🔹त्रिकोणी मालिकेत विदर्भाचा विजय

✒️मलकापूर प्रतिनिधी(मनोज नगरनाईक)

मलकापुर(दि.11ऑक्टोबर):- येथे संपन्न झालेल्या महाराष्ट्र राज्य दिव्यांग क्रिकेट संघटनेच्या वतीने आयोजित T20 त्रिकोणी मालिकेत विदर्भ संघाने शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात तीन धावांनी मुंबई संघावर मात करीत स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले. या अंतिम सामन्यात विदर्भ संघाने 85 धावा काढून 86 धावांचे उद्दीष्ट मुंबई संघासमोर ठेवले असता मुंबईचा संघ शेवटच्या षटकातील अखेरच्या चेंडूवर सर्वबाद 82 धावा करू शकल्याने 3 धावांनी विदर्भाने अंतिम सामन्यात विजय प्राप्त करीत स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले .मुंबई संघाकडून प्रशांत झोमण ने अंतिम क्षणापर्यंत लढा देत 18 धावांची महत्त्वपूर्ण योगदान दिले तर विदर्भ संघाकडून कर्णधार नागेश इंगळे व गणेश पिसालने प्रभावी मारा करून मुंबई संघावर मात करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.

या स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन फॉर डिसेंब्लड व बुलढाणा दिव्यांग क्रिकेट असोसिएशन च्या संयुक्त विद्यमाने टि -20 राष्ट्रीय दिव्यांग त्रिकोणीय स्पर्धेचे बक्षीस वितरण दि.10 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन चे सचिव संजय भोस्करे, धनंजय उपासणी (आंतराष्ट्रीय कोच )चंद्रकांत साळुंके बुलढाणा जिल्हा क्रीकेट संघटनेचे सचिव,राजेश भोसले कोच (सि.एस अकॅडमी )गणेश जाधव अध्यक्ष बुलढाणा दिव्यांग क्रिकेट असोसिएशन, गुरूदास राऊत (आंतराष्ट्रीय खेळाडू,माजी कर्णधार भारतीय संघ) रवी पाटील (माजी कर्णधार भारतीय संघ),कल्पेश गायकर (आंतराष्ट्रीय खेळाडू), धीरज हरडे (आंतराष्ट्रीय खेळाडू),लोकेश मरघडे (आंतराष्ट्रीय खेळाडू), इरशाद खान (सचिव अकोला दिव्यांग क्रिकेट ), सचिन पाखरे (अध्यक्ष अमरावती जिल्हा दिव्यांग क्रिकेट ), निलेश चोपडे (अध्यक्ष दिव्यांग मल्टीपर्पज फाउंडेशन मलकापूर)क्रीडा मार्गदर्शक स्वप्नील साळुंके यांच्या उपस्थित पार पडला.आभार प्रदर्शन जिल्हा दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष गणेश जाधव यांनी केले.