भ्रष्टाचार व नियमबाह्य कामकाजावर अंकुश ठेवण्या करीता समाजाला अण्णा हजारे यांच्या विचाराची व आंदोलनाची गरज- विजय खरवडे

24

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

गडचिरोली(दि.11ऑक्टोबर):-देशात व राज्यात प्रत्येक क्षेञातील सुरु असलेला प्रंचड भ्रष्टाचार लक्षात घेता जनतेवर फार मोठा अन्याय होताना दिसुन येत आहे.अनेक प्रशासकीय कामकाजात जनतेच्या विकासात्मक कामात नियमबाह्यता आढळून येत असुन कर्मचारी,अधिकारी व लोक प्रतीनिधी यांची साखळी तयार झाली.अनेक नागरीकांच्या कामात सरकारी यंञना दप्तर दिरंगाई करीत आहे.प्रशासकीय कार्यालयात अनेक ठिकाणी मनमर्जीपणा,अधिकारशाही व हुकुमशाही सारखी जनतेला वागणूक देताना जाणवत असुन लेकशाही मध्ये जनता मालक कर्मचारी अधिकारी हे जनतेचे नोकर व लोकप्रतिनीधी हे जनतेचे विश्वस्त आहेतपरंतू आज मालक असलेल्या जनतेला आप आपल्या कामा करीता कार्यालया मध्ये हेलपाटे मारावे लागत आहे.

परंतू मुजोरी करणा-या व उर्मटपणे वागणा-या काही अधिकारी व कर्मचारी यांचे मुळे या पुढे जनतेला कसलेही ञास होऊ नये या करीता राष्ट्रहिताची भावना जोपासुन ज्या अण्णा हजारेनी भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाची स्थापना केली व जन आंदोलनाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या हिताचे ग्रामसभा,माहितीचे अधिकार,दप्तर दिरंगाई, बदली विनिमयाचा कायदा व अन्य कायदे करण्यास शासनास भाग पाडले. ही समाजा करीता कधीही न संपनारं अण्णा हजारे यांचे देणं आहे.केंद्रात लोकपाल व राज्यात लोकायुक्त कायदा तयार व्हावा या करीता जेष्ट समाज सेवक पद्मभुषन अण्णा हजारे यांनी अनेक आंदोलन केले यात देशभरातीत जनतेचा मोठ्या प्रमानात प्रतिसाद मिळाला व आता सुध्दा पुरेपुर प्रयत्न सुरु आहेत.

तेव्हा प्रत्येक तालुका स्तरावर निवडक परंतू गुणात्मक निर्वेशनी,चारीञ्यवान ,निपक्ष निष्ठावंत कार्यकर्ते जोडणार असुन भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनात प्रामाणीक कार्यकर्त्याने स्वईच्छेने सहभाग नोंदवावे असे उदगार चामोर्शी तालुक्याच्या कार्यकर्त्याच्या बैठकीत भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे गडचिरोली जिल्हा संघटक विजय खरवडे बोलत होते.

या प्रसंगी जिल्हा संपर्क प्रमुख योगाजी कुडवे,जिल्हा उपाध्यक्ष रमेश बांगरे,जिल्हा सचिव निलकंठ संदोककर,चामोर्शी तालुका संघटक तुषार बनपुरकर, यशवंत ञिकांडे,गौरव लुथडे,दिलीप पोटावार,राजेंद्र धोडरे,नितीन कोत्तावार,धनराज वासेकर,निरज रामानुजमवार,गोकुल वासेकर,सोपान नैताम,नरेन्द्र अलसावार, संजय खरवडे, अमोल मेश्राम,निलकंठ मेश्राम व अन्य कार्यकर्ते उपस्थीत होते.या प्रंसगी चामोर्शी तालुक्यातील निवडक व्यक्तीची तालुका कार्यकारीनीत निवड करण्यात आली.या बैठकीत जिल्हा संघटक विजय खरवडे,जिल्हा संपर्क प्रमुख योगाजी कुडवे,सहसचिव पांडूरंग समर्थ यांनी अण्णा हजारे यांचे समाज कार्य व जिवन शैलीवर प्रकाश टाकला व अनेकांचे मार्गदर्शन लाभले.या कार्यक्रमाचे संचालन प्रास्तविक यशवंत ञिकांडे यांनी केले व आभार तालुकाध्यक्ष तुषार बनपूरकर यानी मानले.