आम आदमी पार्टीचे मारोती पुरी यांचा गोंडवाना गणतंत्र पार्टीत प्रवेश

✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)

जिवती(दि.11ऑक्टोबर):- गोंडवाना गणतंत्र पार्टी हा पक्ष सर्व जाती धर्माचा पक्ष आहे, गोंडवाना हा शब्द जातीवाचक नसून राष्ट्र वाचक आहे. त्यामुळे या पक्षात सर्व जातीधर्मातील लोकांना संधी आहे.

जिवती तालुका आम आदमी पार्टीचे तालुका सचिव मारोती पुरी यांनी गोंडवाना गणतंत्र पार्टी युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष गजानन पाटील जुमनाके यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत, गोंडवाना गणतंत्र पार्टीत प्रवेश केला. त्यांचं पिवळा दुपट्टा टाकत गोंडवाना गणतंत्र पार्टीत स्वागत करण्यात आले. तसेच जिवती तालुका गोंडवाना गणतंत्र पार्टी ओबीसी सेल च्या तालुकाध्यपदी नियुक्ती करण्यात आली.

या वेळी गोंडवाना गणतंत्र पार्टी युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष गजानन पाटील जुमनाके, जिल्हाध्यक्ष बापूरावजी मडावी, कोर कमेटी अध्यक्ष तथा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक पांडुरंजी जाधव, जिवती तालुकाध्यक्ष ममताजी जाधव, माजी सभापती भीमराव मेश्राम व गोंडवाना गणतंत्र पार्टीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्र, मागणी, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED