नवीन संचमान्यता आदेश रद्द करा : अध्यापकभारती ची मागणी

✒️नाशिक,जिल्हा प्रतिनिधी(शांताराम दुनबळे)

नाशिक(दि.11ऑक्टोबर):-शैक्षणिक सत्र सन २०२०/२०२१ व २१-२२च्या संचमान्यतेसाठी शैक्षणिक सत्र सन २०१९-२० ची विद्यार्थीसंख्या ग्राह्य धरून विद्यार्थ्यांची आधार नोंदणी शिथिल करावी व नुकताच शालेय शिक्षण विभागाने शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करता निर्गमित केलेला नवीन संचमान्यता आदेश त्वरित मागे घ्यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांना पाठवलेल्या निवेदनाद्वारे राष्ट्रीय बालक-विद्यार्थी, पालक,शिक्षक,शिक्षण प्रशिक्षण संस्था अध्यापकभारतीच्या वतीने संस्थापक शरद शेजवळ यांनी महाराष्ट्र सरकारकडे केली आहे.

जग मागील दोन वर्षांपासून अधिक काळ कोरोना संसर्ग- प्रादुर्भावामुळे त्रस्त असून जीवनातील सर्वच क्षेत्र तथा मानवी जनजीवन विस्कळीत झाले आहे.प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रावर प्रचंड विपरीत परिणाम झालेला आहे. शासनाने शैक्षणिक सत्र २०२०-२१ व २१-२२ या वर्षांची संचमान्यता करण्यासाठी नुकतेच निर्देश दिले आहेत.अशा आशयाचे पत्र दिनांक ८ सप्टेंबर २०२१ रोजी महाराष्ट्र राज्याचे शिक्षक संचालक यांनी आदेश निर्गमित केले आहे.या पत्राद्वारे विद्यार्थ्यांची आधार नोंदणी अनिवार्य केली असून जे विद्यार्थी आधार कार्डशी जोडलेले असतील त्यांचीच गणना संच मान्यतेसाठी करण्यात येईल असे सुचविण्यात आले आहे.

सदर नोंदणी ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत करण्याची मुदत दिलेली होती एकीकडे कोरोनामुळे आलेला विस्कळीतपणा आणि त्याचा कामावर झालेला दुष्परिणाम यामुळे शिक्षकांना हे कार्य करणे अवघड झालेले आहे.शैक्षणिक सत्र २०१९-२० ची विद्यार्थी संख्या गृहीत धरूनच २०२०-२१ व २१-२२ या वर्षांची संचमान्यता करावी.या संच मान्यतेकरिता आधार नोंदणी सक्तीची करण्यात येऊ नये.अशी मागणी निवेदनाद्वारे शरद शेजवळ, महेंद्र गायकवाड, विनोद पानसरे,वनिता सरोदे,शैलेंद्र वाघ,सुभाष वाघेरे,अझहर शहा,अमीन शेख,नितीन केवटे,प्रा.के.एस.केवट,वसीम शेख,पी.जे.बारे,भारती बागुल,अतुल डांगळे,दीपक शिंदे, कुलदिप दिवेकर संतोष गायकवाड आदींनी केली आहे.

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED